The Sapiens News

दि.सेपिअन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपिअन्स न्युज

अर्थकारण: मुलांना विचाराच हे तीन प्रश्न कुठे, का, कसं जायचं ?

कुठे जायचं का जायचं कसं जायचं ? हे आजच्या तरुण पिढीला कळलं ना तर त्यांना जीवनाचे गणित सोडवणे सुलभ जाईल परंतु प्रश्न हा आहे की आजच्या तरुणांना अगदी ग्रॅज्युएट होईपर्यंत माहिती नसतं या तीन प्रश्नाचे उत्तर. भारतीय तरुणांचं आर्थिक जीवन खूप उशिरा चालू होतं अगदी शेवटच्या वर्षापर्यंत वडिलांकडनं फी घेण्याची गरज त्यांना भासते जी अतिशय वाईट गोष्ट आहे त्यांच्या पुढील आर्थिक संपन्नते करिता संपन्नता येण्याकरिता जीवनात अगदी पाचवी पासूनच अर्थकारण समजून घेणे आवश्यक आहे अर्थकारण हा शब्द जरी मोठा वाटला तरी त्याचा साधं आणि सुंदर स्वरूप म्हणजे कौटुंबिक आर्थिक बाबींचे ज्ञान जे प्रत्येक आई-वडिलांनी मुलांना देणे आवश्यक आहे अगदी लहान वयापासून घरात पैसे कुठून येतात त्यांचा विनियोग कसा केला जातो याच ज्ञान लहान वयातच मुलांना देणे आवश्यक आहे जस आई वडील शालेय शिक्षण महत्त्वाचं मानतात तसं कौटुंबिक अर्थकारण ही तेवढेच महत्त्वाचा आहे. प्रत्येक आईबापांनी मुलांचं व्यावसायिक आयुष्य सुरू होण्यापूर्वीच त्यांना एक प्रश्न विचारणे आवश्यक आहे आणि तो प्रश्न आहे तुला रिटायर कधी व्हायचं आहे आणि त्यासाठी तुझं नियोजन काय आहे.

Vote Here

[TS_Poll id="1"]
UPSE Coaching

Recent Posts