The Sapiens News

दि.सेपिअन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपिअन्स न्युज

ACB : नक्की काय चाललंय, ट्रॅप होतो तरी आरोपी सुटतात

एक माहिती खूप अस्वस्थ करणारी आहे आणि ती म्हणजे 74 पैकी 70 लाचखोर रंगेहात पकडल्या नंतरही निर्दोष्ट सुटले. विशेष म्हणजे साक्षीदार ही फुटले आणि तक्रारदारांनी तक्रारी ही मागे घेतल्या. मग प्रश्न हा की ते पकडताना आलेली तक्रार, सहभागी साक्षीदार, ठिकाण, आरोप अटक, निलंबन, हस्तगत केलेले पैसे, घर झडती, अनेक ठिकाणी धाडी हे सगळ फेक होत का ? आणि पकडल्या नंतर ACB ने जी पाठ थोपटून घेतली जे संबंधित टीमला रिवार्ड व सामाजिक प्रतिष्ठा दिली गेली ती सर्व खोट्यावर आधारित होती का ? मग आणि एक प्रश्न साक्षीदार तर सरकारी नोकर असतात ते फुटलेच कसे फुटून त्यांनी सरकार विरोधी काम नाही का केले. तसेच तक्रारदार तक्रार पाठीमागे का घेतात त्यांच्यावर तसेच जामीनदारांवर काही दबाव होता का काही प्रलोभन तर दिले नाही ना ? असे काय झाले की तक्रार देणारा ही आणि जामीनदारही फिरले म्हणून तक्रारदार आणि जामीनदार यांना मागील काळात आलेले फोन कॉल्स भेटलेल्या व्यक्ती यांच्या माहिती बरोबरच त्यांचे आर्थिक व्यवहार देखील तपासने आवश्यक आहे. परंतु एसीबी हे आमचे काम नाही हे आमच्या कार्यक्षेत्रात येत नाही हे सांगून मोकळी होईल.
दि.सेपियन्स न्यूजची मागणी आहे की निर्दोष सुटलेल्या प्रत्येक गुन्ह्यातील आरोपी जामीनदार, तक्रारदाराची सखोल चौकशी व्हावी. माननीय न्यायालयाला देखील विनंती आहे तसेच कायदे तज्ञांना देखील विनंती आहे की त्यांनी यापुढे धर्मग्रंथांची शपथ देताना संबंधित आरोपी तक्रारदार आणि जामीनदार यांना त्यांच्या मुलांच्या पत्नीच्या आणि आई-वडिलांच्या डोक्यावर हात ठेवून देखील शपथ घ्यायला लावावी कारण धर्म बदलनारा माणूस देवाशी कायम बांधील असेल की नाही याची शंका वाटते हो परंतु आपल्या मुलाबाळांची शपथ घेतल्यास तो तसे खोटं बोलणं अवघड आहे. कारण भ्रष्टाचाराचा लाजखोरीचापैसा तो त्यांच्यासाठीच तर कमवतो आणि त्यांना जर बाधा होत असेल तर तो खोटी शपथ का घेईल आणि भ्रष्टाचार ही का करीन ? नाही का ?