The Sapiens News

दि.सेपिअन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपिअन्स न्युज

गरीब आणि श्रीमंत मानसिकता

आपण गरीब आणि श्रीमंत त्यांच्यातील फरकावर खूप आगपाखड करतो गरीबाची दया आणि श्रीमंतांचा द्वेष करणे हे जणू सामाजिक प्रचलंच झाल आहे. त्यात अतिहुशार लोकांचे सल्ले असतात की समान नागरी कायदा अथवा संपत्तीचे समान वाटप हवे नाही का आणि हा गोंडस विचार सर्वांनाच भावतो. परंतु वस्तुथिती ही आहे की जरी असे केले तरी पुढील 5 वर्षांनी पुन्हा तीच समानतेची स्थिती होणार. अगदी निश्चित का पूर्वीचे श्रीमंत गरीबांना दिलेली संपत्ती चोरणार का तर अजिबात नाही कारण बहुसंख्येने श्रीमंत झालेल्या गरिबांची संपत्ती चोरणे म्हणजे मरणे होय. मग असे काय होणार की श्रीमंत पुन्हा श्रीमंत होणार आणि गरीब पुन्हा गरीब तर येथे प्रश्न गरीब व श्रीमंताचा नाहीये प्रश्न आहे वृत्तीचा विचारांचा आणि कष्ट उचलण्याच्या क्षमतांचा. वर्षानुवर्ष गरिबाला गरीब राहण्याची जशी सवय झालेली असते तसेच श्रीमंताला अधिक श्रीमंत होण्याची आणि हे दोघेही त्यांच्या वृत्ती प्रमाणेच काम करतात मी अनेकदा अनेक सिग्नल वरच्या किंवा कुठेही मंदिरा बाहेरच्या भिकाऱ्यांना काम देण्याची ऑफर दिली परंतु आजवर एकही काम करण्यासाठी तयार झालं नाही आणि मी असे बहुतेक सर्वच श्रीमंत पाहिलेले आहेत ज्यांचं स्टेटस ज्यांची श्रीमंती यांच्या सुविधा ज्यांचा व्यवसाय कमी झालेले त्यांना कधीही आवडलेले नाही आणि लक्षात ठेवा मनुष्य तेच करतो त्याला जे आवडतं गरिबाला गरीब राहणं आवडतं आरामात एकाच जागी गप्पाटप्पा मारण टाईमपास करणं लोळण आवडतं श्रीमंताला घड्याळाच्या काट्यावर आपले दिवसाचे वेळेचे आणि संधीचे नियोजन करणं आवडतं आणि तो तेच करतो. श्रीमंताला जर चांगले जेवण नाही मिळाले  तर तो चिडचिड करतो आणि गरिबाला चांगल जेवण दिलं तर तो म्हणतो आपली चटणी भाकरच बरी. का त्याला अधिक पौष्टिक जेवण तसेच काजू बदामाची आवश्यकता नसते का डेफिनेटली असते परंतु त्यासाठी कष्ट उचलण्याची आवड नसते. गरिबीतही दोन प्रकार पडतात एक लादलेली गरिबीवाले आणि एक लादून घेतलेली गरिबीवाले. लादलेली गरिबीवाले निश्चितच कधी ना कधी श्रीमंत होता परंतु लादून घेतलेले गरीबीवाले कधीच नाही. आणि येथे बहुतांश लादून घेतलेल्या गरीबीवालेच आहेत.