The Sapiens News

दि.सेपियन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपियन्स न्युज

जबाबदार केवळ पोलीसच नाही

सामाजिक स्तरावरती कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य येण्याकरता अनेक घटकांचा सहभाग हवा असतो ज्यात कुटुंब, समाज, शिक्षण, कायदे संस्था आणि त्याचबरोबर पोलीस विभाग यांचा प्रामुख्याने समावेश होतो. यातील एक जरी घटक कमकुवत असेल तर त्या समाजाची वाटचाल ही अराजकाकडे होते. परंतु ही एक साधी गोष्ट अनेक तज्ञांना उमजत नाही किंवा ते त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात असे म्हणतात संपत्ती जवळ असेल तर तिला संरक्षणाची आवश्यकता असते आणि समाज संपन्न करायचा असेल त्याला ही संरक्षणाची आवश्यकता असते आणि तसे असण्यासाठी वरील घटकांचा समन्वय आवश्यक असतो परंतु आपल्या समाजात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न येतो त्या वेळी प्रामुख्याने इतर संस्था हात झटकत ती जबाबदारी केवळ पोलीस विभागावर टाकता परंतु एका सामान्य माणसाचे गुन्हेगारात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेत पोलीस शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आहे. याची क्रमवारी ठरवताना अनुक्रमे कुटुंब शिक्षण या संस्थांचा क्रमांक प्रथम येतो त्याचबरोबर एक जबाबदार नागरिक जो गुन्हेगारास प्राथमिक स्तरावरच प्रतिबंध करेल त्याचा क्रमांक येतो. गुन्हेगारी हाताबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत पोलिसांचे खऱ्या अर्थाने काम सुरू होते जेव्हा वरील तीन घटक अकार्यक्षम होतात त्या वेळेलाच खऱ्या अर्थाने गुन्हेगारी वाढते. जेव्हा गुन्हेगारी वाढते त्यावेळेस पोलिसांना दोष दिला जातो खरंतर तो प्रथमता कुटुंब आणि शिक्षण संस्था यांना देणे आवश्यक आहे. कारण त्यांच्या हातातून सुटत गेलेली परिस्थिती ही पोलिसांना नियंत्रणात आणण्याचे काम असते. परंतु तोवर बरीच वेळ गेलेली असते आणि असेही पोलिसांकडे नावाला अधिकार दिलेले असतात अगदी 24 तास त्यानंतर गुन्हेगार हा वर्ग होतो न्याय संस्थेकडे ज्यात अनेकदा पळवटा शोधून गुन्हेगार आपली सोडवणूक करून घेतात आणि पोलिसांबरोबरच कुटुंब आणि शिक्षण संस्था देखील अशावेळी कुचकामी होतात परंतु एक मात्र नक्की सामाजिक स्तरावर कुठलाही अपप्रकारांना आळा घालण्याचे काम हे केवळ आणि केवळ पोलिसांचेच आहे हे समाज मनावर पक्के बिंबविण्यात आलेले आहे त्यामुळेच आजचा पोलीस आत्मविश्वासहीन झाला आहे आणि तेवढेच हतबलही परंतु सामान्य लोकांचा हा समज आहे की पोलीस काहीही करू शकता आणि पोलिसांच्या हातातच सर्व काही आहे त्याचबरोबर कुठेतरी पोलीस यांना संरक्षित करतात परंतु वरील सर्व आरोप ये इतर सामाजिक संस्थांकडे कधीही बोट दाखवीत नाही आणि केवळ आणि केवळ त्यामुळेच समाज अधोगतीला जातो आणि गुन्हेगारांच्या सापळ्यात अलगद अडकतो. जर खऱ्या अर्थाने समाज गुन्हेगारी मुक्त करायचं असेल तर कुटुंब शिक्षण न्याय संस्थांना कायमस्वरूपी नियंत्रण ठेवणारा राजकारणी स्वच्छ हाताचा हवा परंतु ते सध्या तरी दिसत नाही आणि त्यामुळेच ही दुरावस्था आहे

Vote Here

[TS_Poll id="1"]
UPSE Coaching

Recent Posts