The Sapiens News च्या वाचकांना माहित आहे. मागील महिन्यात येवला येथे येवला पोलीसांनी एक अभिनंदनीय व मोठी कारवाई केली. या कारवाईत मोठ्याप्रमाणात अमली पदार्थ पकडण्यात आले आणि जिल्ह्यात या घटनेने एकच खळबळ उडाली. कारण दोन, एकतर येवला हा महाराष्ट्रातील नेत्यात ज्येष्ठ व दिग्गज समजल्या जाणाऱ्या भुजबळांचा मतदार संघ आहे आणि दोन एवढ्या दिवस अगदी रहिवाशी भागात असलेल्या या गोडाऊनकडे यंत्रणांचे लक्ष कसे गेले नाही.
विशेषतः स्थानिक तक्रारी असून ही. त्याच बरोबर एक शंका ही आहे. ज्या कर्मचाऱ्याचे यात नाव जोडले जात असल्याचे कळते. त्या छोट्याशा पदावरील व्यक्तीत एवढे मोठे कांड आणि कारस्थान करण्याची क्षमता व धाडस आहे ? तेही नाशिकहून आणि भुजबळांच्या गडात व एकट्याने ? की त्याला गोवुन कुणा मोठ्या माशाला वाचविण्याचा प्रयत्न आहे आणि त्याचा संबंध असेल तर तो एकटा हे सगळं मॅरेज करू शकेल ? विशेष जो मुख्य आरोपी पकडला गेला त्याचे आणि कुणाकुणाशी संबंध होते हेही देखील तपासून पाहणे आवश्यक आहे काही कॉल रेकॉर्डिंग आणि यात विभागाचे किती व्यक्ती अडकले आहे ? हे प्रकरण केवळ एकाला बळी देऊन दडवण्याचा तर प्रयत्न नाही ना ? तसेच एलसीबीच्या कर्मचाऱ्यातील हेवेदावे व गटबाजी तर नाही ना ? जी सर्वश्रुत आहे.
असेही असेल की या पाठीमागे अनेक आणि मोठे व्यक्तींचे नेक्सस असावे. आता ही शक्यता सत्य की असत्य पडताळून पाण्याची क्षमता, अधिकार आणि कर्तव्य नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांचे आहे. आम्हाला विश्वास आहे या प्रकरणाची व्याप्ती खूप मोठी आहे त्यामुळे एकाच व्यक्तीवर फोकस करणे व दोषारोप ठेवणे हे संयुक्तिक होणार नाही. एक मात्र ठामपणे आम्ही सांगू शकतो हे काम एवढ्या छोट्या पदावरील व्यक्तीच्या क्षमते पलीकडले आहे.आणि असेलच तर तो कर्मचारी छोटा नाही. या केवळ शक्यता आहे आणि या दृष्टिकोनातून समाज हितार्थ तपास व्हावा हे आमचे आवाहन आहे.
शिरीष प्रभाकर चव्हाण संपादक : दि सेपिअन्स न्यूज तथा RTI कार्यकर्ता




