The Sapiens News

दि.सेपियन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपियन्स न्युज

लग्नाच्या आमिष दाखवून गर्भपात प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक भागवत ज्ञानोबा मुलगीर यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप नोंदवले गेले आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना पीडित तरुणीशी परिचय वाढवून तिचा विश्वास जिंकत, कॅफेत नेऊन तिच्यावर जबरदस्ती केली असल्याची तक्रार दाखल आहे.

तक्रारीनुसार पीडिता गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने तिच्यावर दबाव टाकला, मानसिक त्रास दिला आणि गंभीर धमक्या देत तिला जबरदस्तीने गर्भपात करवून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणात आरोपी भागवत मुलगीर यांच्या वडिलांना आणि बहीणीलाही सहआरोपी करण्यात आले असून, सर्वांवर बलात्कार, धमकी, गंभीर गुन्हे तसेच अत्याचार प्रतिबंधक कायदा (Atrocity Act) अंतर्गत केस दाखल झाली आहे.

सध्या आरोपी नाशिक पोलिस अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. तपास सुरू आहे.

Vote Here

[TS_Poll id="1"]
UPSE Coaching

Recent Posts