आमचे मित्र नितीन पाराशेरे गुरुजी यांनी आमच्याकडे पाठवलेला हा लेख आपण नक्की वाचावा…
जेव्हा एखादी व्यक्ती रोज 12 तास या प्रमाणे सतत 12 वर्षे वेळ अध्ययनाला देते तेव्हा त्याला घनपाठी बनता येत.
घनपाठ पूर्ण करण्याचा क्रम असा आहे .
१ वेदाचा घनपाठी म्हणजे घन नांवाची वेदाची विकृति पठण करणारा जटा , माला , शिखा , रेखा , ध्वज , दंड , रथ व घन अशा वेदपाठणाच्या आठ विकृती आहेत
1) पदपाठ – संहितेत जे मंत्र आलेले आहेत ते वेगवेगळे करून म्हणणे म्हणजे पदपाठ होय.
संहितेत ..कुक्कुटोsसि मधुजिह्वoअसे आले आहे तर..याचा पद पाठ.कुक्कुटः असि मधुजिह्वsइति मधु जिह्वः असा पद पाठ होईल
पदपाठ असणे फार महत्त्वाचे आहे ह्या पायावर पुढील इमारत उभी आहे
यजुर्वेदात सुमारे 2000 मंत्र तर ऋग्वेदामध्ये साधारणपणे 10500 मंत्र आहेत. या सगळ्या मंत्राना वेगवेगळं करून म्हणणे हा झाला पदपाठ.
उदा- सा रे ग म प ध नि सा
2) क्रमपाठ — वेगवेगळी असलेली पदे विशिष्ट क्रमाने म्हणणे म्हणजे क्रमपाठ होय.
या मध्ये प्रत्येक पद 1-2-2-3-3-4-4-5 या क्रमाने म्हटले जाते. अभ्यासक्रम पूर्ण करायला साधरणपणे 2 वर्षे लागतात.
उदा- सारे ,रेग, गम, मप,पध ,धनि, निसा
3) जटापाठ -जर संहिता म्हणायला 15 मिनटं वेळ लागला तर जटापाठ म्हणायला 2 तास लागतो यामध्ये 1-2-2-1-1-2 असा क्रम झाल्यावर पहिले पद सोडुन दिले जाते मग 2-3-3-2-2-3 मग 2 रे पद सोडून दिले जाते या क्रमाने म्हटले जाते
उदा – सा-रे-रे-सा-सा-रे
4 ) घनपाठ- संहितेतील प्रत्येक पद 1-2-2-1-1-2-3-3-2-1-2-3 मग पहिले पद सोडून द्यावे मग 2-3-3-2-2-3-4-4-3-2-2-3-4या क्रमाने म्हणावे.जर
उदा- सा-रे-रे-सा-सा-रे-ग-ग-रे-सा-सा-ग-रे
हा वेळ आणी कष्ट फक्त मंत्र शिकण्यासीठी आहेत ..
हे मंत्र कुठे वापरायचे कसे वापरायचे .. कुठल्या यज्ञात वापरायचे ह्याचे ज्ञान ग्रहण करण्याला लागणारा वेळ हा वेगळाच लागतो
अष्टविकृती मुळे कोणालाही वेद मंत्रांच्या अक्षर काना मात्रा यात बदल करणे शक्य नाही ना कोणालाही व्याकरण दृष्टीने शक्य नाही
ऋग्वेद यजुर्वेद प्रातिशाख्य नावाचे स्वतंत्र व्याकरण वेदांच्या करिता स्वतंत्र आहे
हजारो वर्षा पासुन हि गुरुशिष्य वेदाक्षर ब्रह्म कंठस्थ परंपरा अव्याहत परंपरा ब्रह्मवृंदानी प्राणांतिक जपवणूक करीत अपार परिश्रमाने जपून ठेऊन पुढिल पिढीला दिली आहे
धन्यती भारतभूमी धन्य ती गुरुशिष्य परंपरा





