‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ योजनेअंतर्गत एकाच महिन्यात ४५,९११ सौर कृषी पंप बसवून महाराष्ट्राने एक नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. राज्य वीज कंपनी महावितरणने म्हटले आहे की या कामगिरीला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने अधिकृतपणे मान्यता दिली आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शेंद्रा एमआयडीसीमधील ऑरिक सिटी मैदानावर प्रमाणपत्र सादरीकरण समारंभ आयोजित करण्यात आला होता.





