एका व्यक्तीने प्रत्येक कामात पैसा खाल्ला अगदी कुणाचे चांगले करण्यासाठीच नाही तर कुणाचे खनण्यासाठी ही याने टेंडर घेतले. पहा किती उचकोटीचा हा माणूस भ्रष्ट आहे. अशाच एका म. अधिकाराच्या खनण्याच्या टेंडरमध्ये याने पैसे घेतले आणि त्या अधिकाऱ्यास छळ छळ छळले. शेवटी तिने लढण्याचे ठरवले. तिने RTI माध्यमातून दाद मागितली. अर्थात तिच्या अर्जाला खाली कागदाची टोपली दाखविण्यात आली पण तिने पिच्छा सोडला नाही. अगदी वरपर्यंत लढली आणि तिला उत्तर द्यावच लागलं. ज्यावर हे महाशय निलंबित झाले सगळीकडे छि थू झालीच. आयुष्यावर काळा डाग लागला. त्यातून सावरता न सावरता यांनी परत नकोत धंदे सुरू केले विशेष म्हणजे यांच्यावर चालवलेल्या चौकशीत हे दोषी आढळले तर यांच्यावर कारवाई न होण्यासाठी यांना किती रात्री तळमळत चिंतेत काढाव्या लागल्या आणि किती ठिकाणी पाया पडावे लागले हे सर्वश्रुत आहे. एकदम लाजिरवाण जीवन तरी देखील यांची खाबुगिरी बंद झाली नाही. वर बसलेल्या एका भ्रष्ट व्यक्तीस ज्याला मी King of sewer म्हणतो. त्याला 125000 देऊन प्रकरण मॅनेज केले. ते होते न होते आम्ही मागे लागलो. जे याच्यासाठी जीवनातील सर्वात क्लिष्ट प्रकरण आहे. आता मागील 7 वर्षांपासून हा व्यक्ती घोर चिंता भीती मानहानी अवमान जीहुजुरी करीत जगत आहे आणि पुढे ही जगणार. धड मुलाचा वाढदिवस ही याला साजरा करता आला नाही. ना जीवनातील सुंदर क्षण. त्यात बाहेरील गलिच्छ लफड त्याचा ताण वेगळाच. मग यात चूक कुणाची ? अर्थातच याचीच आणि हे सुरू कुठून झालं. लाचखोरीतून आज हा व्यक्ती निष्कल्क असता तर वरील अनिष्ट जीवनात आले असते का ? तर नाहीमिळणाऱ्या पुरेशा पैशात हा स्वाभिमानाने जगला असता मुलाच्या वाढदिवसाच्या केकची चव आनंदात आणि समाधानाने घेता आली असती पण नाही हे सुधारायचे नाही आणि असा एक नाही अजून आहे. राग नाही कीव येते या लोकांची.





