विशेष पथकाकडून गावठी कट्टा जप्त देवराम संतु सोनवणे हा इसम ताब्यात

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांनी आदेशीत केल्या प्रमाणे, नाशिक जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन तसेच सराईत गुन्हेगारीस प्रतिबंध होण्यासाठी सत्वर कारवाई करण्यात येत आहे.
दिनांक २३/१२/२०२५ रोजी मा. पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांचे विशेष पथकातील अधिकरी व अंमलदार असे अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी गस्त घालत असतांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार, त्रंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्यीत पेगलवाडी फाटा येथे रोडवर एक इसम अवैधरित्या घातक अग्नीशस्त्रे बाळगुन काहीतरी गुन्हा करण्याचे उद्देशाने फिरत असल्याची बातमी मिळाली. त्याप्रमाणे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्रंबकेश्वर मधील पेगलवाडी फाटा येथे सापळा लावुन संशयीत इसमास शिताफिने ताब्यात घेतले. सदर इसमास विचारपुस केली असता त्याचे नाव देवराम संतु सोनवणे, वय ४६ वर्ष, रा. तळेगाव, ता. त्रंबकेश्वर, जि. नाशिक असल्याचे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याचे कब्जात ०१ देशी बनावटीचे पिस्टल (गावठी कट्टा) व ०१ जीवंत काडतूस, ०१ मोटारसायकल, मोबईल फोन असा मुद्देमाल मिळून आला. सदर इसम हा विनापरवाना बेकादेशीररित्या घातक अग्नीशस्त्र कब्जात बाळगांना मिळून आला असून त्यांचेविरुध्द त्रंबकेश्वर पोलीस ठाणेस भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ सह मपोकाक १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील व अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री. आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थागुशाचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर व विशेष पथकातील सहा. पोलीस निरीक्षक श्री. श्रीकांत पाटील, पोउनि शैलेश पाटील, श्रेपोउनि शांताराम नाठे, पोहवा जालिंदर खराटे, सुशांत मरकड, भाऊ झाडे, शंकर साबळे, सुनिल बर्वे तसेच तांत्रीक विश्लेषण विभाग नाशिक ग्रामीण विभागाचे हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, नितीन गांगुर्डे प्रदीप महाले यांचे पथकाने सदरची कारवाई केली आहे.
संपादक : शिरीष प्रभाकर चव्हाण , The Sapiens News




