The Sapiens News

दि.सेपियन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपियन्स न्युज

पंतप्रधानांनी घेतली नीती आयोगामध्ये अर्थशास्त्रज्ञांची भेट

उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, २०२७ पर्यंत विकसित भारताची संकल्पना आता केवळ सरकारी धोरणांपुरती मर्यादित न राहता, एक सामूहिक आकांक्षा बनली आहे. शिक्षण, उपभोग आणि जागतिक गतिशीलतेमधील बदलत्या पद्धती संपूर्ण समाजात वाढत्या महत्त्वाकांक्षेचे प्रतिबिंब आहेत, ज्यासाठी अधिक मजबूत संस्थात्मक क्षमता आणि दूरदृष्टीच्या पायाभूत सुविधांच्या नियोजनाची आवश्यकता आहे, असे त्यांनी नमूद केले.

दीर्घकालीन आर्थिक वाढ टिकवून ठेवण्यासाठी सर्व क्षेत्रांमध्ये मिशन-मोड सुधारणांची गरज असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. धोरणनिर्मिती आणि अर्थसंकल्प २०२७ च्या संकल्पनेवर आधारित असले पाहिजेत, ज्यात जागतिक क्षमता निर्माण करण्यावर आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी भारताचे सखोल एकात्मीकरण सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे ते म्हणाले. जागतिक कार्यबलासाठी भारताला एक प्रमुख केंद्र म्हणून स्थापित करण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.

संवादादरम्यान, अर्थशास्त्रज्ञांनी उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील उत्पादकता आणि स्पर्धात्मकता वाढविण्यावर आपले विचार मांडले. उच्च कौटुंबिक बचत, मजबूत पायाभूत सुविधा विकास आणि प्रगत तंत्रज्ञानाचा अधिक वापर याद्वारे संरचनात्मक परिवर्तनाला गती देण्यावर चर्चा केंद्रित होती.

सहभागींनी सर्व क्षेत्रांमध्ये उत्पादकतेसाठी उत्प्रेरक म्हणून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या भूमिकेवर प्रकाश टाकला आणि सर्वसमावेशक व कार्यक्षम वाढीचा पाया म्हणून भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या सततच्या विस्तारावर चर्चा केली.

अर्थशास्त्रज्ञांनी नमूद केले की, २०२५ मध्ये हाती घेतलेल्या व्यापक आंतर-क्षेत्रीय सुधारणांनी, तसेच पुढील वर्षात त्यांच्या नियोजित एकत्रीकरणाने, भारताचे आर्थिक मूलभूत घटक मजबूत केले आहेत. या उपायांमुळे भारताला सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये आपले स्थान टिकवून ठेवण्यास मदत होईल, तसेच विकासाच्या नवीन संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या संवादात शंकर आचार्य, अशोक के. भट्टाचार्य, एन. आर. भानुमूर्ती, अमिता बत्रा, जन्मेजय सिन्हा, अमित चंद्रा, रजनी सिन्हा, दिनेश कानाबार, बसंत प्रधान, मदन सबनवीस, आशिमा गोयल, धर्मकीर्ती जोशी, उमाकांत डॅश, पिनाकी चक्रवर्ती, इंद्रनील सेन गुप्ता, समीरन चक्रवर्ती, अभिमान दास, राहुल बाजोरिया, मोनिका हलन आणि सिद्धार्थ सन्याल यांसारख्या अनेक अग्रगण्य अर्थशास्त्रज्ञ आणि तज्ञांनी भाग घेतला.

Vote Here

[TS_Poll id="1"]
UPSE Coaching

Recent Posts