The Sapiens News

दि.सेपिअन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपिअन्स न्युज

प्रजासत्ताक दिन २०२६ महाराष्ट्र चित्ररथ

आज भारतात 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय. त्यामुळे या निमित्ताने दिल्लीतील कर्तव्य पथावर विविध राज्यांच्या चित्ररथांचं सादरीकरण करण्यात आलं.

भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्यपथावर आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

कर्तव्यपथावर एकूण 17 राज्यांचे चित्ररथ पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर सरकारच्या विविध विभागांचे असे एकूण 30 चित्ररथ पाहायला मिळणार आहेत.
कर्तव्यपथावर एकूण 17 राज्यांचे चित्ररथ पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर सरकारच्या विविध विभागांचे असे एकूण 30 चित्ररथ पाहायला मिळणार

यामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथात गणेशोत्सवाचं सादरीकरण करण्यात आलं आहे.

चित्ररथात गणेशोत्सव जो महाराष्ट्राचा राज्यउत्सव आहे त्या गणेशोत्सवाचं सादरदीकरण या ठिकाणी पाहायला मिळतंय.
चित्ररथात गणेशोत्सव जो महाराष्ट्राचा राज्यउत्सव आहे त्या गणेशोत्सवाचं सादरदीकरण या ठिकाणी पाहायला मिळतंय.

गणपती बाप्पाच्या मन मोहून टाकणाऱ्या रूपासह महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वैभवाचे भव्य दर्शन घडले.

या चित्ररथात गणपतीचं स्थान, गणपती विसर्जन आणि महाराष्ट्रातील अष्टविनायकाचं दर्शन घडवण्यात आलं आहे.
महाराष्ट्राचा चित्ररथ येताच केंद्रीय कॅबिनेट मंत्री पियुष गोयल आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी सन्मानाने उभे राहिले.
महाराष्ट्राचा चित्ररथ येताच केंद्रीय कॅबिनेट मंत्री पियुष गोयल आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी सन्मानाने उभे राहिले.

या ठिकाणी ढोलताशे, तसेच, लेझीम पथक देखील दाखवलं आहे.

ढोलताशाच्या गजरात महाराष्ट्राचा सुंदर असा चित्ररथ पाहायला मिळतोय.एकूणच या चित्ररथात महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि गणेशोत्सवाचा उत्सव साकारण्यात आला आहे.

Vote Here

[TS_Poll id="1"]
UPSE Coaching

Recent Posts