नाशिकच्या महापौर यांनी स्वतः आपल्या फेसबुक पेजवर ही माहिती दिली जी पुढील प्रमाणे आहे
नाशिक मनपाचे २०० कोटींचे ‘ग्रीन बाँड्स’ लाँच!
पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या धर्तीवर नाशिक महापालिकेने २०० कोटी रुपयांचे ‘ग्रीन म्युनिसिपल बाँड्स’ लाँच केले आहेत. आगामी कुंभमेळा आणि मुकणे पाणी पुरवठा योजनेच्या विस्तारासाठी या निधीचा वापर केला जाणार असून, गुंतवणूकदारांना ८.०५ टक्के परतावा मिळणार आहे.
नाशिक – सिंहस्थ कुंभमेळ्यात गोदावरीच्या स्वच्छतेसाठी ‘क्लीन गोदावरी बॉण्ड’द्वारे निधी उभारल्यानंतर नाशिक महापालिकेने आता पाणी पुरवठा योजनेच्या विस्तारासाठी हरित महापालिका कर्जरोखे (ग्रीन म्युनिसिपल बाँण्ड्स) विक्रीची घोषणा केली आहे. या माध्यमातून २०० कोटी रुपये उभारले जाणार आहेत. हिंदु धर्मियांच्या जगातील सर्वात मोठ्या सोहळ्यात कर्ज रोख्यात गुंतवणूक करून सहभागी व्हावे, असे आवाहन माझ्यासह उपमहापौर विलास आण्णा शिंदे व मनपा आयुक्त मनिषा खत्री यांनी केले आहे.




