या स्तंभलेखाचा उद्देश केवळ हा आहे की नाण्याला देखील दोन बाजू असतात हे समाजापुढे मांडणे.
पार्श्वभूमी : सध्या आपल्या कानावर अशा अनेक बातम्या येतात ज्यात सावकारीत कसे कुणी मोठे व्याज ओरबाडून, लावून कुणास लुटले. मुख्यत्वे यात पीडित आणि पिडा देणारा, लुटारू, निष्ठूर ज्याला सावकाराचा tag लावला जातो तो, पोलिस यंत्रणा, वृत्तपत्रे आणि न्यायव्यवस्था अशी पात्रे असतात. आता आपण एक एक पात्र पाहू या.
पात्र 1पीडित :
पिडित म्हटले की आपल्याला लागलीच कपडे फाटलेला व मळके असलेला अशक्त लाचार हात जोडून उभा असलेला व्यक्ती दिसतो. किंबहुना पूर्वीपासून आपल्याला हेच चित्र रंगविले जाते. परंतु आजच्या जगात असेही पीडित आहे. जे BMW त फिरतात, नको नको ते लफडे करतात, ज्यात व्यभिचार, व्यसन आर्थिक अपहार व जुगार खोटारडेपणा हे असतेच असते. चुकीचे आणि अती लोभापोटी गैरव्यवहार करून ही मंडळी फसलेली असते. यांनी यांच्या नको त्या उद्योगांमुळे बँका, ओळखीचे, अनोळखी, मित्रमंडळीच काय स्वतःच्या आई, बाप, भाऊ, पत्नी, मुलांना देखील गोत्यात आणलेले असते. सातत्याने कर्ज फेडण्यासाठी कर्ज घेणारा हा दलदलीत फसलेला प्राणी त्या दलदलीतून बाहेर पडण्यासाठी व स्वतःला वाचविण्यासाठी अनेकांना गोत्यातच आणीत नाही तर आपल्या जागी त्याला गाडतो ही. हे करतांना त्याला कोणताही विधिनिषेध नसतो व केल्यावर शल्य देखील. ही मंडळी एकाच वेळी घरच्या दाराच्यानं बरोबरच स्वतःला देखील फसवतच नाही तर पोखरत असतात. अशा लोकांचा एकतर अकाली शेवट होतो अथवा त्यांच्या मुळे कुणाचा.
पात्र 2 सावकार संबोधलेला खरा पिढीत :
हे पात्र खर तर सर्वाधिक पीडित असते आणि याच्या पीडांची सुरुवात मित्राशी असलेल्या आपुलकी, जिव्हाळा आणि प्रेमाच्या संबंधापासून ते कोर्टाच्या चकरा मारेपर्यंत होते या सर्व प्रवासात सुरुवातीला अतिशय जवळचा प्रेमळ असलेला व्यक्ती हा त्याच्या आर्थिक अडचणी घेऊन येतो पाया पडतो दोस्तीचे दाखले देतो त्या माया पोटी हा सावकार म्हणून त्या त्याला थोडी मदत करतो. त्यानंतर संबंधित पीडित संबोधला गेलेला व्यक्ती हा त्याचा विश्वास संपादन करीत सुरुवातीचे काही व्यवहार हे प्रामाणिकपणे करतो आणि जेव्हा विश्वास संपादन होतो. त्यावेळेस हा व्यक्ती त्याकडून मोठी रक्कम घेतो किंबहुना थोडे थोडे करून मोठी रक्कम होते आणि जेव्हा देण्यास टाळाटाळ होते. ठरलेल्या वेळी तारखा चुकतात त्यावेळी या मैत्रीत कुठेतरी मीठ पडते ज्याला सर्वस्वी जबाबदार स्वतःला पीडित म्हणून घेणारा व्यक्ती असतो. पुढे जाऊन त्या बदल्यात मदत करणाऱ्या व्यक्तीस पीडित व्यक्ती काही अतिरिक्त मोबदला देण्याचे कबूल करतो आणि वेळ काढू घेतो. खरतर त्याच्याकडे भविष्यात देखील काही येणार नसते. त्याने बाहेर देखील अनेक व्यवहार केलेले असतात त्यामुळे तो पुरता फसलेला असतो. परंतु तो त्याच्याबरोबर या मित्राला देखील फसवतो. पुढे मैत्रीत वाद होतात काही लिखापडी होतात. अनेक चेक देखील बाऊन्स होतात ठरलेले वचन पाळले जात नाही आणि या व्यक्तीला मदत केल्याचा मनस्ताप होतो. परंतु त्या सर्व प्रक्रियेत पीडित छद्मी व्यक्ती कायदेशीर पुरावे गोळा करत असतो आणि एक दिवस त्या कायदेशीर पुराव्यांच्या आधारेच तो या मदत करणाऱ्या व्यक्तीवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करतो. असा गुन्हा अशा कर्माची शिक्षा जी मदत म्हणून सुरू झालेली असते.
पात्र 3 पोलीस यंत्रणा :
जेव्हा स्वतःला पीडित म्हणून संबोधणाऱ्या व्यक्तीस कळते की तो पूर्ण फसत चाललेला आहे आणि त्याला पुढे जाऊन काही मोठा अपाय होऊ शकतो ज्यात त्याची सामाजिक प्रतिष्ठा आणि बरंच काही असतं. त्यावेळी तो त्याच्या जागी मदत करणाऱ्या मित्रालाच सर्वप्रथम बळी देतो. त्याची मुख्य कारणे ही की हे सोपे जाते तिथे विश्वास असल्यामुळे विश्वासघात करणे सोपे होते. संबंधित मित्राच्या देखील काही अडचणी काही लूप होल्स याने छद्मीपणे काव्याने जमून ठेवलेले असतात. त्याचाच उपयोग करून हा त्याच्यावर सावकारीचे गुन्हे दाखल करण्यासाठी धजावतो. अनेकदा त्यात यशस्वी देखील होतो. त्याचा मुख्य कारण हे की पोलीस यंत्रणा किंवा संबंधित अधिकारी हा संपूर्णपणे सुव्यवस्थितपणे पार्श्वभूमी समजून घेत नाही मदत करणाऱ्याला झालेला मनस्ताप त्याच्या लेखी शून्य असतो किंबहुना काही अधिकारी या पीडित म्हणावणाऱ्या व्यक्तीच्या प्रलोभनाला देखील बळी पडतात. परंतु त्यांची संख्या तशी कमी असते. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही असते की पोलीस यंत्रणांवर कामाचा या मोठा बोजा असतो की ते त्या प्रकरणाला तेवढा वेळ देऊ शकत नाही. खरंतर आर्थिक व्यवहार हे दिवाणी प्रकरणात मोडत असून देखील त्याला फौजदारीत परावर्तित करण्याकरिता पीडित व्यक्ती हा मदत करणारे व्यक्तीकडून शारीरिक व मानसिक त्रास देण्याचा आरोप करतो. त्यामुळे पोलिसांना देखील नाईलाज होतो आणि तक्रार घ्यावीच लागते जर तक्रार नाही घेतली आणि पुढे जाऊन पीडित व्यक्तीने स्वतःच काही कमी जास्त करून घेण्याचा प्रयत्न केला तर सर्वस्वी खापर पोलिसांवर फुटते असेही आलेली तक्रार घेणे हे कायद्याने पोलिसांचे प्रथम कर्तव्य सांगितलेला आहे. ते त्यांना करावंच लागतं नाहीतर अनेक दबाव त्यांच्यावर येतात त्यांची ही अडचण देखील समजून घेणे आवश्यक आहे. परंतु येथेही माफक अपेक्षा ही की पीडित व्यक्तीचे आर्थिक व्यवहार जे मदत करणाऱ्या व्यक्ती बरोबरच नाही तर इतर स्तरावर देखील आहेत ते आधी तपासणे यंत्रणांनी आवश्यक आहे. एवढे केले तरी स्वतःला पीडित म्हणून घेणारा व्यक्ती नक्की कसा आहे हे पोलिसांना लागलीच लक्षात येईल.
पात्र 4 पत्रकार :
या सर्व प्रकरणात आणि पात्रता सर्वात महत्त्वाचे जर कुणी पात्र असेल तर ते पत्रकार. यात पत्रकारांचे पात्र किंवा रोल यासाठी महत्त्वाचा असतो कारण पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या प्रत्येक तक्रार अथवा गुन्ह्याची माहिती यांना मिळते आणि त्याच माहितीच्या आधारे हे वृत्तपत्रात लिहितात अनेकदा वस्तुस्थिती ही नाही हे माहिती असून देखील. कारण आपल्याकडे कागदाला महत्त्व आहे जे कागदावर असेल तेच लिहावे नाहीतर अब्रू नुकसानीचा दावा देखील पत्रकारांना सोसावा लागतो असे प्रकार अनेकदा झाले आहे आणि अशावेळी त्यांना कुणीही मदतीला येत नाही. त्यामुळे जे कागदावर दिसतं तेच त्यांना लिहावं देखील लागत. त्याचबरोबर त्यांना सत्यता पडताळून पाहण्याकरिता अद्यावत सुयोग्य असे साधन देखील नसते ना त्यासाठी पुरेसा वेळ. परंतु यामुळे होते हे की जो मदत करणारा पीडित मित्र असतो किंवा नातेसंबंधातला व्यक्ती असतो त्याची सामाजिक स्तरावरती फार मोठ्या प्रमाणात बदनामी होते. जो असह्य क्लेश त्याला वृत्तपत्रात बातमी आल्याने होतो तेवढा क्लेश कदाचित त्याला शिक्षा झाल्यानंतर देखील होत नाही. अनेकदा या प्रकरणात मदत करणारा व्यक्ती सुटतो देखील परंतु ज्या प्रक्रियेतून त्याला जावं लागतं की प्रक्रिया एवढी क्लेशदायी असते की कायद्याच्या शिक्षापेक्षा सामाजिक शिक्षा त्याला फार मोठ्या प्रमाणात त्याची अगदी चुकी नसताना देखील मिळते आणि ती केवळ प्रसार माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांमुळे ज्यांचा आधारच मुळात खोटा असू शकतो. कारण तक्रारदार पीडित स्वतःला दाखवणारा व्यक्तीच हा खोटा असतो परंतु री पुढे अगदी पोलीस स्टेशन पर्यंत ओढली गेल्यामुळे व यंत्रणांना देखील मर्यादा असल्यामुळे कुणाचा तरी बळी जातो आणि तो बळी अनेकदा त्या मित्राचा असतो जो मदतीसाठी पुढे येतो. आणि बळी देणारा तोच पीडित असतो जो कधीकाळी याचा जवळचा मित्र असतो.
पात्र 5 न्याय व्यवस्था :
हा या सर्व प्रकरणातील शेवटचा आणि प्रभावशाली असला तरी तथ्यांच्या आणि कागदाच्या आधारे न्याय देणारा घटक असला तरी तो तांत्रिक बाजून पेक्षा भावनिक बाजूंना आणि मानवतेला तेवढे ध्यानी घेत नाही कारण तांत्रिक बाजू पाहूनच न्यायदान करणे आपल्याकडे सक्तीचे आहे. संबंधित यंत्रणा अथवा व्यवस्था ही चुकीची आहे हे येथे दाखवायचे नसून त्यांच्यापर्यंत आलेल्या कागदावरच त्यांना निर्णय द्यावा लागतो यात असे अनेकदा होते की न्यायालयाला देखील माहिती असते ती मदत करणारा व्यक्ती हाच खरा पिढीत आहे परंतु त्यांना टेक्निकली ते दाखवणे शक्य नसते आणि टेक्निकली जे दाखवणे शक्य नसते त्यावर न्यायदान होत नाही. खरंतर यात न्यायव्यवस्थेची फारशी काहीही चूक नसते जे समोर येईल जे जसं ठेवलं जाईल त्यावरच त्यांना न्याय निवडा करावा लागतो न्यायालय चौकशी आदेश देऊ शकतात चौकशी करू शकत नाही हीच सर्वात मोठी न्यायव्यवस्थेची कमकुवत स्थिती आहे. त्यात वर्षानुवर्ष चालणाऱ्या तारखा ह्यात अनेक प्रकारचे व्यत्यय आणतात.
सारांश : या सर्व पात्रात मदत करणारा ज्याला सावकार म्हणून संबोधले आहे तो पोलीस, यंत्रणा, पत्रकार न्यायव्यवस्था यांचा फारसा दोष जरी नसला तरी देखील यांच्यावर असलेली बंधने अथवा त्यांच्या कामात येणाऱ्या असंख्य अडचणी काही वेळा त्यांच्याकडून सदोष काम करून घेण्यास कारणीभूत ठरतात. जे त्यांना देखील अनाकलनीय असते किंवा अकरणीय जरी असले तरी येथे माणसापेक्षा कागदाला महत्त्व दिले जाते त्या व्यवस्थेत या सर्व गोष्टी होणारच येथे सर्वस्वी दोष हा स्वतःला पीडित म्हणवणाऱ्या स्वार्थी व्यक्ती नातेवाईक अथवा मित्राचा जरी असला तरी कायद्याच्या कसोट्यांवर व एकदा गुन्हा नोंद झाल्यानंतर त्याला दोषी ठरवणे हे खूप अवघड, वेळखाऊ आणि जिकरीचे जाते. परंतु यात जो मदत करणाऱ्याला व त्याच्या कुटुंबाला मनस्ताप होतो. तो अगदी मदत करणारा निर्दोष सुटला तरी भरून निघत नाही. न्यायालय न्याय निवाडा हा न्यायालयीन आवारात करते परंतु सामाजिक स्तरावर करते परंतु मदत करणाऱ्याची यापूर्वीच मोठ्या प्रमाणात नाचक्की, अवहेलना झालेली असते आणि समाजाकडून देखील स्थापत्य वागणूक मोठ्या प्रमाणात मिळालेली असते.
संपादक : शिरीष प्रभाकर चव्हाण
दि. सेपिअन्स न्यूज तथा आरटीआय कार्यकर्ता





