समाजात असे विषारी पीक येण्याचे कारण महिला महिलांना साथ देत नाही, महिला स्वतःला देखील साथ देत नाही आणि नको त्या प्रलोभनालाकडे महिला आकर्षित होतात
असे रावण रुपी खरात कितीतरी आहेत. एक फक्त पकडला गेला अजूनही अनेक सक्रिय आहेत. सरकारी कार्यालयात, खाजगी कार्यालयात, सामाजिक स्तरावर, अनेक ठिकाणी अगदी तुमच्या ओळखीचे, तुमच्या अवतीभवती, रोज महिलांना ब्लॅकमेल केलं जातं. त्यांच्या भावनांचा त्यांच्या शरीर व मनाचा अस्खलित दूर उपयोग होतो. “आली तर छान नाहीतर खूप घाण”. पुरुष कोठे.ही तोंड मारेल अगदी घरी बायको तरी. परंतु एखाद्या महिलेने काही आगळीक केली तर तिला नको ते टोमणे मारले जातात. तिला एका विशिष्ट नावाने संबोधले जाते अगदी ती विधवा असली तरी. जोवर महिलेला पुरुषाची भावना व्यक्त करायला आणि स्वसंरक्षण करायला गरज असेल तोपर्यंत अशोक खरात सारख्या नीच लोकांचे पाळेमुळे समाजात अधिक घट्ट होतील. परंतु यात पुरुषच दोषी आहे असे नाही महिला देखील महिलांना काही निकृष्ट दर्जाच्या पुरुषांचे ऐकून किंवा काही लोभ घेऊन चांगल्या महिलांना त्रास देण्याच काम करतात आणि हे सरकारी कार्यालयात सर्रास होते “ये नाहीतर उपेक्षा”. एक महिला लढा तरी किती दिवस देणार शेवटी की तुटते कारण तिच्यासारखीच सर्वार्थाने असलेली महिला त्या निकृष्ट दर्जाच्या पुरुषांना साथ देण्यासाठी स्वयंम् असते. सुदैवाने एक गोष्ट नक्की हे 99 गुन्ह्यात स्वतःला वाचवतात परंतु एक दिवस अशी छोटीशी चूक होते जी यांचं अस्तित्व संपवते. जेवढा काळ अधिक लागेल तेवढी शिक्षा अधिक होईल. कॅप्टन खराब सारखी अगदी वयाच्या 65+ ला जेव्हा सर्वार्थाने व्यक्ती अशक्त होतो शरीराने आणि मनाने देखील…..एका विधवेला आली नाही म्हणून गडचिरोलीला फेकले जाते…..कारण सांगितले जाते ती तसली आहे. पण ती विधवा आहे हो आधार शोधणारच की हा तर जिवंत पत्नीचा पती आहे ना मग हिशोब तर समान व्हायला हवा…. पण चूक अशांची नाही महिलांची आहे नको त्या गोष्टीच्या आहारी जातात आणि स्वतःला अडकून घेतात ब्लॅकमेलिंग होण्यासाठी अनेक महिला पदनामी सहन करून देखील मूग गिळून गप्प असतात…. फक्त म्हणतात मी त्याला असं दाखविन त्याला तसं दाखवीन महिलांना हेच कळत नाही काही न करणे खूप काही सोसण्यासारखं असतं.
संपादक : शिरीष प्रभाकर चव्हाण
दि. सेपिअन्स न्यूज तथा RTI कार्यकर्ता




