The Sapiens News

दि.सेपिअन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपिअन्स न्युज

गुंतवणूक गोल्ड सिल्वर आणि स्टॉक मधील

आम्ही मागे जेव्हा गोल्ड व सिल्वर खूप वरती गेलेले व स्टॉक मार्केट खाली पडत होते तेव्हा म्हणालो होतो की आता लोक गोल्ड घेतील व मार्केट पासून दूर पळतील. त्यावेळी ही अनेकांनी गोल्ड व सिल्वरच घेतले स्टॉक नाही आणि आज गोल्ड 25 % व सिल्वर 65 % खाली आले आणि लोक अडकले इकडे आजही मार्केट व अगदी कॉलिटी स्टॉक्स पडलेले आहेत पण लोक आजही दूर पळता आहेत खर तर थोडे थोडे करून स्टॉक घ्यायला आले परंतु भाजीपाल्यात पाच  दहा रुपये वाचवणारे वीस पंचवीस टक्के स्टॉक पडले तरी घ्यायला तयार नाही शेवटी मानसिकतेचा प्रश्न आहे. पण येथे नक्की सांगिन शेवटी गुंतवणूक आहे चैनीच्या वस्तूत वायफळ खर्च नाही. आज नाही तर उद्या वाढेनच मग तर स्टॉक्स असो व गोल्ड सिल्वर दीर्घ काळासाठी सर्वच छान आहे. म्हणून कोठे ही करा पण investment करा ऍपल फोन घेऊन शायनिंग करण्या व EMI भरण्याचा मूर्खपणा करण्यापेक्षा investment केलेली बरी अगदी कासवाच्या चालीने चाललात तरी चालेल. चैनीच्या आणि show off च्या फालतू गोष्टी घेण्यापेक्षा. नाही का ?