अनेकांचा समज असतो की युद्ध झालं की सोन वर जातं आणि ते बऱ्याच अंशी खरं देखील आहे परंतु त्याला एक लूप होल आहे आणि ते म्हणजे युद्ध कोठे होतं. युद्ध जर आखाती देशात झालं तर सोनं स्वस्त होत नाही त्याचं कारण हे आहे की क्रूड ऑइल महाग होतं आणि आजही क्रूड ऑइल डॉलरमध्येच मोस्ट ऑफ घेतल जाते. डॉलरची डिमांड वाढल्याने तो महाग होतो कारण ज्याची डिमांड जास्त तो दुर्मिळ होतो आणि दुर्मिळ वस्तूंना जास्त किंमत मिळते. त्याचबरोबर जेव्हा क्रूड ऑइल महाग होतं त्यावेळी सर्वच गोष्टी महाग होता आणि सामान्य घरातला देखील गॅसपासून ते इतर सर्व गोष्टींपर्यंतचा खर्च आपोआप वाढतो कारण आजही जगातलं 95% ट्रान्सपोर्टेशन हे ऑइल वर डिपेंड आहे. मला सांगा तुमच्या घरात चूल पेटवणं महाग झालं तर तुम्ही सोनं घ्यायचा विचार कराल का आणि जेव्हा एखाद्या गोष्टीची डिमांड कमी होते. त्या वेळेला तिची किंमत देखील कमी होती म्हणजेच हे जग 95% क्रूड वर चालतं. म्हणून सोन विकण्यांपेक्षा पेट्रोल विकणारे जगात आणि भारतात ही अधिक श्रीमंत आहे कितीतरी अधिक. उदा. अंबानी जे ऑइल प्रोसेस मध्ये आहे. त्यांच्या मनाने भारतातला कोणताही ज्वेलर श्रीमंत नाही अगदी हिरे विकणारा देखील. जगात सोन्या चांदी पेक्षाही अधिक किंमत जर कसली असेल तर ती क्रूड ऑइलची आहे आणि ती तेव्हा अधिक वाढते जेव्हा आखाती देशात युद्ध सुरू होते. सप्लाय कमी होतो तेच युद्ध अफगाणिस्तान व्हिएतनाम चायना भारत पाकिस्तान झाले इव्हन युक्रेन आणि रशिया जरी झाले तरी क्रूड ऑइलचे भाव वाढत नाही आणि घरात येणाऱ्या अन्नपदार्थांचे देखील त्यावेळी भाव वाढतात ते सोन्याची नाही. कारण त्या वेळेला चुलीचा प्रश्न नसतो. जगात संपन्नता विलासिता चैनीच्या गोष्टींवर खर्च तेव्हाच होतो ज्या वेळेला पोटात दोन घास गेलेले असतात हे जागतिक सूत्र आहे. सोन खाता येत नाही. सोन संपन्नतेशी निगडित आहे परंतु संपन्नतेचा विचार तेव्हाच येतो ज्यावेळेस चूल पेटलेली असते.





