The Sapiens News

दि.सेपिअन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपिअन्स न्युज

“नमस्ते नाशिक फाउंडेशन” चा स्तुत्य उपक्रम, गरजूंना माठ, मिठाई, पिण्याच्या पाण्याचे ग्लास वाटप

“ पिण्याचे पाणी हे केवळ गरज नाही… तो प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे!”
स्वच्छ पिण्याच्या पाण्यावर समान अधिकार गाजवूया, स्वच्छतेतून आरोग्य आणि आरोग्यातून आनंद निर्माण करूया!
महावीर जयंतीच्या पवित्र औचित्याने
नमस्ते नाशिक फाउंडेशन, नाशिक यांच्या वतीने
“स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा वापर वाढवूया – पाणी पिण्याचा अधिकार गाजवूया!”

संस्थेच्या अध्यक्षा स्नेहल देव व सहकारी गरजूंना माठ वाटप  करताना

हा समाजोपयोगी उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आला दान करून पुण्य कमवा या उपक्रमाअंतर्गत ही वस्तू भेट म्हणून देण्यात आली. गरजू बांधवांना माठ (मटके), मिठाई आणि पिण्याचे ग्लास वाटप करण्यात आले —


फक्त वस्तू नव्हे, तर थंडावा, आदर आणि माणुसकी देण्याचा हा प्रयत्न होता. भगवान महावीरांच्या विचारांतून प्रेरणा घेत —
“जगातील प्रत्येक जीवात स्वतःला पाहा — हीच खरी मानवसेवा”
या तत्वावर चालत, संस्थेच्या अध्यक्षा स्नेहल देव यांच्या संकल्पनेतून
हा उपक्रम साकार झाला. सप्रे वाडी या गावामध्ये निराधार, गरजू व शेतमजूर कुटुंबांना माठ, मिठाई व ग्लास भेट देण्यात आले. तसेच NAB महाराष्ट्र संकुल येथे अंध बांधवांनाही पिण्याच्या पाण्याचे माठ, मिठाई व ग्लासांचे वाटप करून “सेवा हीच खरी संवेदना” याची प्रचिती देण्यात आली. त्या थंड पाण्याच्या घोटात फक्त तृप्ती नव्हती, तर आधार, आपुलकी आणि माणुसकीचा स्पर्श होता… आणि तोच आनंद प्रत्येक लाभार्थ्याच्या चेहऱ्यावर झळकत होता! या उपक्रमासाठी महावीर इंटरनॅशनलचे अनिल नहार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी नमस्ते नाशिक फाउंडेशन च्या अध्यक्ष स्नेहल देव


सामाजिक कार्यकर्ते सुनील यलमामे, संगिता बाफना, भंडारी, अनुसया भांसी, दत्तात्रेय गुळवे,अशोक साळुंके, दिगंबर येलमामे,बाळा भाऊ चांदगीर,
कृष्णा तेलंग, तुकाराम येलमामे, Adv रोहिदास तारगे, किशोर बाफना उपस्थित होते “दानातून फक्त वस्तू देऊ नका… भावना द्या, माणुसकी जपा!” “एक माठ — अनेकांच्या आयुष्यातील थंडावा!”

Vote Here

[TS_Poll id="1"]
UPSE Coaching

Recent Posts