The Sapiens News

दि.सेपिअन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपिअन्स न्युज

स्नेहल देव व नमस्ते फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

“तुमचा छोटासा सहभाग एखाद्या कुटुंबासाठी जगण्याची नवी आशा ठरू शकतो.”
जीवनात मागे बघाल तर अनुभव मिळेल,
पुढे बघाल तर आशा मिळेल,
इकडे-तिकडे बघाल तर सत्य दिसेल,
आणि स्वतःच्या अंतरात्म्यात डोकावाल तर आत्मविश्वास मिळेल.
याच आत्मविश्वासातून नमस्ते नाशिक फाउंडेशन यांच्या वतीने गरजू व अपंग कुटुंबांना किराणा वस्तूंचे वाटप करण्यात आले.
भारतामध्ये अनेक कुटुंबे आर्थिक अडचणींमध्ये जीवन जगत आहेत. अनेक महिलांच्या पतींना नियमित उत्पन्न नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबासमोर उपासमारीचे संकट निर्माण होते. अशा परिस्थितीत पौष्टिक, स्वच्छ आणि ताजे अन्न मिळणे ही त्यांची अत्यंत मूलभूत गरज ठरते.
या सामाजिक जाणिवेतून नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. स्नेहल देव यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. समाजातील गरजू बांधवांना मदतीचा हात देत त्यांच्या जीवनात आनंद, आधार आणि आशेचा किरण निर्माण करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.
या उपक्रमासाठी श्री. अजय देव व सौ. कमल पाटील व श्री नहार यांचे मोलाचे सहकार्य लाभले, नमस्ते नाशिक फाउंडेशन यांच्या वतीने आपणास आवाहन करण्यात येते की, आपणही या समाजोपयोगी उपक्रमात सहभागी होऊन गरजूंच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करावा. चला, एकत्र येऊन माणुसकीची नवी ओळख निर्माण करूया आणि समाजासाठी प्रेरणादायी कार्याचा भाग बनूया.

Vote Here

[TS_Poll id="1"]
UPSE Coaching

Recent Posts