The Sapiens News

दि.सेपिअन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपिअन्स न्युज

नगरसेविका डॉ. पूनम महाले यांची नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरिता प्रभागा २४ मध्ये विविध ठिकाणी भेट

नासिकमध्ये प्रचंड झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणी नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ज्यात रस्त्यावर झालेली खड्डी, साचलेली पाण्याची तळी, काही ठिकाणी झाडे उंबळून पडल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्याला प्रभाव 24 मधील नागरिक देखील अपवाद नाही. त्यातच प्रभागात स्वच्छतेचा देखील प्रश्न उपस्थित झाला असून त्याचबरोबर नंदिनी नदीला देखील मोठ्या प्रमाणात पूर आल्याने नागरिकांना झालेल्या असुविधांचे निरसन करण्याकरिता प्रभाग क्रमांक 24 च्या नगरसेविका डॉ. महाले या प्रचंड पावसात देखील स्वतः फिरून जातीने नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

नगरसेविका डॉ. पुनम महाले यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत कामे करण्यात आली त्यावेळी प्रभागातील नागरिक देखील उपस्थित होते


विशेष म्हणजे असलेल्या समस्यांचे तात्काळ महानगरपालिकेच्या यंत्रणेकडून निरसन करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत ज्यासाठी त्यांना नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळताना दिसत असून स्वतः नगरसेवक अडचणीच्या काळात उपस्थित राहिल्याने प्रभागातील नागरिकांना एक सुखदः धक्का बसल्याचे देखील नागरिकांच्या बोलण्यातून व्यक्त होत आहे. स्वतः नगरसेवक जातीने लक्ष घालून काम पहात असल्याने आपण निवडलेला लोकप्रतिनिधी हा योग्य असल्याची भावना अबालवृद्धांमध्ये व्यक्त केली जात आहे.
डॉक्टर महाले या आत्याआवश्यक कामांना प्राधान्य देत व नागरिकांच्या सुरक्षा तसेच आरोग्याच्या निगडित समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असून त्यांचा हा प्रयत्न अतिशय कौतुकास्पद असल्याची भावना प्रभागात व्यक्त केली जात आहे. समस्यांवर तात्काळ उपाययोजना झाल्याने अतिवृष्टीत व पावसाळ्या सारख्या कठीण परिस्थितीत देखील नागरिकांना एक दिलासा मिळत आहे.

अतिवृष्टीमुळे रस्त्याची झालेली दुरावस्था