मुंबई: इतरांची दुष्कृत्ये, गुन्हे आणि कोट्यवधींचे घोटाळे उघडकीस आणणाऱ्या मुंबई पोलीस दलालाच आपल्याच खात्यातील घोटाळ्याचा मोठा हादरा बसला आहे. पोलीस दलात कार्यरत नसलेल्या भलत्याच व्यक्तींना पोलीस कर्मचारी दाखवण्यात आले. या कथित पोलिसांच्या नावे तब्बल ६.५ कोटी रुपयांचा पगार लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रादेशिक विभागाच्या पोलीस निरीक्षकांच्या तक्रारीवरून समतानगर पोलीस ठाण्यात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





