The Sapiens News

दि.सेपिअन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपिअन्स न्युज

TSN fiction Cover Story : Steno “The बदली माफिया” आणि खूप काही

माऊली वरुणकर ( काल्पनिक व बदललेले नाव ) एक अतिसामान्य शरीरयष्टी व बुद्धिमत्तेचा व्यक्ती कसा झाला बदली माफिया ? केवळ व्यक्तीची नाही किडलेल्या व्यवस्थेची कहाणी


                             डिस्क्लेमर                                  प्रस्तुत वृत्तलेख हा प्रशासकीय यंत्रणेत चालणाऱ्या संभाव्य गैरप्रकार, भ्रष्टाचार आणि पदाच्या गैरवापरा बाबत जनजागृती करण्याच्या आणि सामाजिक हिताच्या उद्देशाने तयार करण्यात आलेला आहे. यातील व्यक्तिरेखा व प्रसंग हे प्रातिनिधिक/काल्पनिक स्वरूपाचे असून, प्रशासनातील भ्रष्ट प्रवृत्तीवर प्रकाश टाकणे हाच यामागील मुख्य हेतू आहे. ही कव्हर स्टोरी काल्पनिक आहे की सत्य याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आमच्या सन्माननीय वाचकांना ही आहे. आम्हाला विश्वास आहे ते योग्य तर्क साधत अचूक निष्कर्ष काढतील.


आम्ही आमच्या मागील अंकात तळटीप दिलेली. “बदली माफिया स्टेनो”… त्याचीच वचनपूर्ती या अंकात. परंतु ही बातमी करताना वीणा कारण ज्या अडचणी आल्या त्यात अप्रत्यक्ष धमकी आणि प्रलोभने ही होती. हे येथे नमूद करणे आवश्यक वाटते.

ही कहाणी आहे एक उदाहरण म्हणून घेतलेल्या माऊली वरुणकर ? ( काल्पनिक व बदललेले नाव ) या अतिसामान्य बुद्धिमत्ता आणि शरीरयष्टी व अतिशय भ्रष्ट म्हणून चर्चेत असलेल्या लाचखोर बदली माफियाची. ज्याच्या पदरात एक अती शक्तिशाली आणि वरिष्ठांच्या निकट असलेले steno हे पद पडते वा असे म्हणा खेळाडू कोट्यातून बनावट प्रमाणपत्र देऊन पाडून घेतले गेल्याचे समजते आणि तो त्याचा ज्या पद्धतीने गैरवापर व दूरउपयोग करतो याचीच प्रचिती देणारा हा लेख.

बदलीचे प्रकार, पद्धती आणि बदली माफीयाचा प्रवास

साधारण दहा-बारा वर्षांपूर्वी या स्टोरीच्या खलनायकाची steno या पदावर नियुक्ती होते. ती ही खोटे बनावट क्रीडा प्रमाणपत्र जोडून. त्याच बरोबर जात प्रमाणपत्र ही जुगाड पद्धतीने मिळविलेले असल्याचे कळते. तत्पूर्वी या पात्रास शासनाच्या कार्यपद्धतीचा चांगलाच अनुभव असावा याच्या कार्यपद्धतीवरून अनुमानित होते. त्यामुळे शासकीय सेवेतील खाचखळगे किंवा कच्चे दुवे अवगत होतात. सुरवात प्रशिक्षणार्थींच्या बदल्यांनी झाल्याचे समजते. त्यातूनच आवश्यक असलेल्या ओळखी, पदेे कशा पद्धतीने भरली जातात, कुणाच्या हातात हे काम असते, बदलीचे किती पैसे घेणे, पुढे किती पाठवणे स्वतः किती गाळा काढणे, बदलीसाठी आवश्यक असलेल्या अटी शर्ती व पळवाटा यांची माहिती व प्रशिक्षण प्रशिक्षणार्थींची बदली करताना मिळत असल्याची माहिती आहे. सुरुवातीला दुक्का म्हणून सुरू झालेला हा खेळ 100% सक्सेस होत नसे. परंतु दहा लोकांचे पैसे घेऊन पाच लोकांच्या नशिबाने बदल्या होत व ज्या पाच लोकांच्या होत नसे त्यांचे पैसे परत दिले जाईल.

पुढे जाऊन या भ्रष्ट म्हणून चर्चेत असलेल्या व्यक्तीच्या भात्यात दोन बाण आले. एक स्वतःहून वाढवलेल्या ओळखी आणि दोन अतिउच्च पदस्थ अधिकाऱ्याचा स्टेनो होणे. जे बदलींचा टॉप माफिया होण्यास सहाय्यभूत झाले. त्यामुळे हेतूत विणलेले ओळखीचे जाळे गरजू मिळवून देणे व विविध विभाग व शाखेत बदली करून देण्यास व वरिष्ठ अधिकाऱ्यांची छत्रछाया प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भ्रष्टकर्म संरक्षित करण्यास सहाय्यभूत ठरी. त्यातूनच एक नेटवर्क किंवा नेक्सस तयार झाले जे विविध सामाजिक स्तरावर या स्टेनोला प्रस्थापित करण्यास कारणीभूत ठरले. धूर्त, मधाळवाणी त्या जोडीला अध्यात्मिकतेचे वलय व कोल्ह्याचे नाटक सर्व स्तरावर प्रस्थापित होण्यास मदत करी. हे कमी की काय या बदलांच्या पापकर्मातून आलेल्या अपार पैशातून याने अनेक स्थावर आणि जंगम मालमत्ता खरेदी केल्याचे कळते.

प्रॉपर्टीचा धंदा आणि रियल इस्टेट एजंट

त्याचबरोबर चापलुशी आणि लंपटवृत्ती रियल इस्टेट एजंट होण्यास फारशी मदत करीत नाही. परंतु याने या अवगुणांचा देखील यासाठी उपयोग करून घेतला. मग काय बदल्यांबरोबर रियल इस्टेट एजंट, मेडिकल बिल काढून देणे तसेच बांधकाम व्यवसायात ही वाटचाल सुरू झाली. जशी कामे जोडत गेली तसे एक प्रचंड भ्रष्ट नेक्सस आणि नेटवर्क तयार झालं. जे आज बदल्या, बांधकाम, मेडिकल बिल या सर्वांमध्ये काम करतं. रिअल इस्टेट एजंटमध्ये तर या महाशयांनी जवळच्यांना देखील सोडले नाही प्रत्येकाला गोड बोलून “माझे यात काहीच नाही” असे म्हणून बिल्डरकडे न्हायचे आणि पाठीमागून कमिशन घ्यायचे. हा याचा धंदा. ( येथे एक गोष्ट नमूद करतो शासकीय सेवकाला त्याच्या नोकरी व्यतिरिक्त कुठलाही असला व्यवसाय करता येत नाही. ) “ऐसा एक भी सगा नही जिसे इसने ठगा नही” तेच हे. कोणीही असो पैसे घेण्यात, तोडीपाणी करण्यात, मापात पाप करण्यात याचा हातखंडा. याचा रियल इस्टेटचा व्यवसाय प्रचंड जोमत असून याने काही लोक देखील कामाला ठेवले आहेत. अनेकदा बिल्डरांकडून प्रॉपर्टी तोडून घेऊन स्वतः त्यात मोठा नफा काढून ती विकणे हा याचा प्रमुख व्यवसाय. अगदी शासकीय सेवेत असताना देखील. किंबहुना त्याच नोकरीचा आणि पदाचा दुरुपयोग किंवा उपयोग करून याने या व्यवसायात पाय भक्कम केले आहे. अशी विश्वसनीय माहिती आहे.

पैसे घेण्याची पद्धत

या बहाद्दराने स्वतःभोवती असे चाटूकारांचे वलय तयार केले आहे. जे कोणत्याही संकटाला प्रश्नाला किंवा प्रॉब्लेमला हाच उपाय आहे हे विभागात पेरतात आणि त्यात ते यशस्वी देखील होतात. एकदा का लोकांचा समज हा वैद्य म्हणून झाला की लोक आपले आजार घेऊन याच्याकडे येतात. अर्थात ते शासकीय विविध कामा संबंधात असतात. अनेकदा हा स्वतः एका विशिष्ट व दुसऱ्याच्या नंबरने ( नंबर बदलणे हा याचा आवडता छंद ) संबंधितांना संपर्क साधतो आपली डिमांड ठेवतो आणि त्यांचं काम करण्याच आश्वासन देतो. पैसे घेताना देखील हा एका विशिष्ट व्यक्तीला पुढे करतो जो खाजगी इसम आहे. त्याचबरोबर प्रॉपर्टीचे काम करीत असल्याने त्या संबंधात डॉक्युमेंट गव्हर्मेंट बॉण्ड्स याच्या माध्यमातून लिखापडी करून पैसे खातो. ते देखील काही वेळा इतरांच्या नावे असते. अनेकदा पैसे कॅशच घेतले जातात किंवा कुठल्या विशिष्ट ठिकाणी ठेवले जातात यासाठी देखील जाणते अजातेपणाने तो त्याच्या संबंधित, जवळच्या, हाताखालच्या लोकांचा अस्खलित उपयोग करून घेतो असे कळते.


दोन गाजलेल्या घटना

या महाशयांने एकदा एका अतिउच्च अधिकाऱ्याचा निनावी अर्ज त्यांच्या वरिष्ठांना पाठवीलेला. ज्यात त्या अधिकाऱ्यांविषयी अतिशय खोटे आरोप केलेले तसेच त्यांच्या बदनामीचा उद्देश ठेवून खोटी दिशाभूल करणारी व बनावट माहिती त्यांच्या वरिष्ठांना त्या पत्राद्वारे कळविलेली. परंतु हे महाशय त्या खोटेपणात सापडले आणि अक्षरक्ष त्यांना या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पाया पडत खोट्या क्षपता घेत रडत माफी मागावी लागली. त्यावेळी यांची कशीबशी नोकरी वाचली नाही तर हे निलंबित होणार असल्याची देखील चर्चा होती.

यांची प्रसिद्ध मंदिर यात्रा विशेष चर्चिली जाते जी एका बदली करून दिलेल्या कर्मचाऱ्याने स्पॉन्सर केलेली. पैसे घेण्याची ही अनोखी पद्धत तशी नवीन जरी नसली तरी लाचखोरीच्या पैशावर देवदर्शन हे निंदनीय नक्कीच आहे. कदाचित यांच्या पादस्पर्शाने कलुशीत झालेल्या या काही लोकांना देवाची दानपेटी लुटण्याचा अवगुण प्राप्त झाला असावा.


सूत्रांकडून विश्वसनीय माहिती मिळते की

१ स्टेनो पदाकरिता दिले बनावट क्रीडा प्रमाणपत्र ? : “या महाशयांची क्रीडा कोट्यातून झालेली भरती आणि सादर केलेले क्रीडा प्रमाणपत्र संशयाच्या भोवऱ्यात असून, याची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.”

२ जुगाड जात प्रमाणपत्र ? : “संबंधित कर्मचाऱ्याचे जात प्रमाणपत्र देखील पडताळणीच्या निकषांवर संशयास्पद असल्याचा दावा सूत्रांकडून केला जात आहे.”

टिप : महिलांविषयी वि…. व व्य….. हा सर्वात प्रखर अवगुण या अंकात आम्ही देत नाही आहोत तो खूप मोठा असल्याने विस्ताराने. तोवर क्रमश :


अवगुणांचा कॉम्बो पॅक

देवाच्या नावाआड हे सगळं : हे सर्व माऊली या देवाच्या नावा आड करतो. त्यासाठी हा त्याची मधाळवाणी आणि काही अलंकारिक शब्द याचा अस्खलित वापर करून समोरच्याला तो किती अध्यात्मिक आणि चारित्र्य संपन्न आहे हे दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो जसा खरात करी. म्हणूनच याला मिनी खरात संबोधने देखील कमी नाही. विशेष म्हणजे याला एवढ्या खो… आहे हे सामान्य लोकांना समजतही नाही आणि ते याला एक सभ्य सुशिक्षित संस्कारी व्यक्ती समजतात मी अनेकदा बोलले जाते.

भ्रष्टाचारी आणि लाचखोर : हे दोन गुण कुटून भरलेला हा व्यक्ती कॅडेट, मंत्रालयीन कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या करून अमाप माया जमवतो आहे. याचे रेटकार्ड हे पद, बदलीचे ठिकाण यावर ठरते. ज्यासाठी हा वरिष्ठांची मर्जी, स्वपद याचे शासनात असलेले संबंध व याने नेमलेले खाजगी व खाते अंतर्गतही एजंट तसेच विविध दूरध्वनी क्रमांक यांचा वापर करीत असल्याचे विश्वासने सुत्रंकडून कळते.

कपटी, कावेबाज, धूर्तपणा : या स्टेनोची मोडस ऑपरेंडी उच्च पातळीची असून त्यासाठी तो याच्या कपट कावेबाज व धूर्तपणा या अंगभूत गुणाचा अस्खलित वापर करतो नी अतिशय असंवेदनशीलपने वागून समोरच्याचा काटा काढतो. यासाठी याला स्त्री व पुरुष असा कोणताही विधी निषेध नसल्याचेही समजते.

चापलूस व चूघलखोर : हे याचे सर्वात विशेष गुण असून वरिष्ठांचा विश्वास संपादन करण्यासाठी चापलुशी, पुढेपुढे करणे व त्यांचा आशीर्वाद मिळताच रस्त्यात येणाऱ्या प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा काटा काढणे हा याचा आवडीचा छंद. या गुणांच्या सहाय्याने त्याने अनेक प्रामाणिक कर्मचाऱ्यांचे जीवन नको नको करून टाकले आहे. विशेष म्हणजे त्यामुळेच याला कुणी विरोध करत नाही आणि याच्यावर अनीच्छेने स्तुती सुमने उधळतात. कारण हा अधिकाऱ्यांच्या जवळ असल्याचा त्यांना दम भरतो असे दबक्या आवाजात बोलले जाते.

गोड जीभ नी वि…. मन : हा व्यक्ती जरी अनेक प्रकारचे कुकृत्य करीत असला तरी कुणाला त्याचा आजवर मागमुसही लागत नसे कारण याची मधाळ वाणी, वरकरनी अतिशय मित्तभाषी आणि सोज्वळ वाटत असलेला हा व्यक्ती आपल्या मनातील वि….. विचार समोरच्याला कळू न देता प्रत्यक्षात आणतो.


यंत्रणेला, प्रशासनिक अधिकाऱ्यांना काही थेट प्रश्न

१ एक सामान्य कर्मचारी एवढा शक्तिशाली होतोच कसा ?
२ या सारख्या व्यक्तींच्या वर्तनाची वरिष्ठांना माहिती असते का आणि असल्यास ते कानाडोळा करतात का ?
३ वेळोवेळी विभागाला दिलेल्या माहितीत हे कर्मचारी आपल्या मालमत्तेची खरी माहिती देतात का ?
४ संशयास्पद वर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गोपनीय माहिती काढण्याचे काम वरिष्ठ करतात का ?
५ वरिष्ठांच्या निकटवर्तीय कर्मचाऱ्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणे कितपत योग्य आहे ?
६ एक अतिशय छोट्या पदावरील कर्मचारी मोठ्या वरिष्ठांच्या डोळ्यात धुळफेक करूच व त्यांची दिशाभूल कसा करू शकतो.
७ विभागातील इतर कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी अशा कर्मचाऱ्यांच्या तक्रारी येत असतात त्याची योग्य ती व कायदेशीर दखल घेतली जाते का ?
८ हे कर्मचारी आपल्या वरिष्ठांच्या मर्जीत असण्याचा व कृपादृष्टीचा गैरउपयोग करून जी ही काळी कामे करतात त्याला अप्रत्यक्ष संरक्षण वरिष्ठांचेच असते का ?
९ यांची सेवापट वेळोवेळी तपासली जातात का व त्यात नमूद केलेल्या माहितीचा आढावा, विश्लेषण व सत्यता पडताळून पाहिली जाते का ?
१० कोणताही कर्मचारी त्याला मिळालेल्या शिक्षा व चौकशीचे आदेश सेवापटातून गहाळ करण्याची क्षमता ठेवतो का आणि ठेवत असेल तर त्याला प्रतिबंध कसा करता येईल ?
११ कार्यालयातील निवडक कर्मचाऱ्यांच्याच हातात सर्व सत्ता देऊन व त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास टाकून वरिष्ठ इतर कर्मचाऱ्यांवर अन्याय करीत नाही का ?


शिरीष प्रभाकर  चव्हाण                                            संपादक : The Sapiens News तथा RTI कार्यकर्ता

Vote Here

[TS_Poll id="1"]
UPSE Coaching

Recent Posts