उंटवाडीतील गणराज मित्रमंडळाचा स्तुत्य उपक्रम
नाशिक येथील तिडके नगर , उंटवाडी परिसरातील तरुणांनी श्री शिव छत्रपती जयंती अतिशय सुसंस्कृत पद्धतीने साजरी करीत खऱ्या अर्थाने छत्रपतींचा आदर्श पुढे नेण्याचा कौतुकास्पद प्रयत्न केला त्या अनुषंगाने छत्रपतींचे विचार जनसामान्यात सर्वदूर पोहचवण्याचे उल्लेखनीय कार्य या तरुणांची केले आहे.
कोणताही फाफट पसारा कर्कश्य आवाजातील DJ वरची गाणी न वाजवता अतिशय सुंदर पद्धतीने श्री शिव छत्रपतींच्या विचारांची शिजोरी त्यांनी परिसरातील जनतेला देण्याचा उपक्रम राबविला आहे. या श्री शिव जयंती उत्सवास त्यांनी ख्यातनाम श्री शिव छत्रपती व्याख्याते श्री प्रशांत पाटणकर (आर्ट डिरेक्टर मुंबई) यांचे व्याखाय परिसरातील राजीव गांधी उद्यान तिडके नगर येथे आयोजित केले होते. या व्यख्यानाच्या आयोजनाचा उद्देश एक नी एकच छत्रपतींचे उर्जादायक कार्य जनसामान्य तसेच तरूणांमध्ये पोहचवणे ज्यात ते यशस्वी झाल्याचे दिसते. सकाळी विधिवत शिव छत्रपती मूर्ती पूजन करून सायंकाळी त्यांनी श्री शिव व्याख्यानाचे आयोजन केले होते.
हे व्याख्यान ऐकण्यासाठी परिसरातील आबालवृद्धांची मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली. परिसरातील वातावरण शिवमय करण्याचे व तरुणांच्यात श्री शिव छत्रपतींचे विचार उर्जित करण्याचे अतिशय सुंदर कार्य या शिव भक्तांनी केले त्यासाठी परिसरातील सर्वांनीच त्यांचे कौतुक करीत आभार देखील मानले.
संपादक
शिरीष प्रभाकर चव्हाण
The Sapiens News