उपनगर हद्दीतील श्री श्री रविशंकर मार्ग येथील महादेव सोसायटीत काल सायंकाळी ही घटना घडली. अमोल काठे या माझी सैनिकांच्या पत्नीचे कुंदन घडे या व्यक्तीबरोबर अनैतिक संबंध अनेक वर्षांपासून होते. त्यामुळेच अमोलने कौटुंबिक न्यायालयात फारकतीचा खटला दाखल केला होता. काल अमोल त्याच्या पत्नीच्या घरी महादेव सोसायटीत गेला असता त्याला तेथे कुंदन भेटला त्यावेळी त्यांची बाचाबाची होऊन झटापट झाली सुरवातीला अमोलने कुंदनला चाकूने वार करून जखमी केले त्यात चाकू खाली पडला मग त्याने रिव्हॉल्व्हर काढली तीही खाली पडली तू तात्काळ कुंदनने उचलून अमोलच्या डोक्यात त्यातून गोळी झाडली. गोळी लागताच अमोल खाली पडला आणि त्याचा त्यात जागीच मृत्यु झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी व युनिट चे पथक आणि अधिकारी, कर्मचारी यांनी धाव घेतली. जखमी कुंदन घडे याचा भाऊ चेतन घडे यास ताब्यात घेतले.
