नाशिक : लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ४८०० रुपयांची लाच घेताना प्रभाग समन्वयाकास अटक केली आहे. देविदास चव्हाण असे अटक करण्यात आलेल्या समन्वयक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान कळवण जि नाशिक याचे नाव आहे. तक्रारदार यांनी केलेल्या कामाचे तीन महिन्याचे 16800 रुपये तक्रादार यांचे बँक खात्यावर जमा झाले. त्याचे मोबदल्यात स्वतःसाठी व त्यांचे वरिष्ठ यांचेसाठी दि 6 मार्च रोजी कार्यालयात ४८०० रुपये लाचेची मागणी केली. दि. 11 मार्च रोजी ग्रामपंचायत कनाशी भक्त निवास पाच पांडव मंदिर हॉल येथे 4800 रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचेवर अभोणा पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक
श्रीमती वैशाली पाटील, पोहवा / शरद हेंबाडे, महिला पोलीस अंमलदार शीतल सूर्यवंशी यांनी केली.
