नाशिक : नाशिक शहराची सिटीलींक बस सेवा ही तिसऱ्या दिवशी विस्कळीत झाली असून सिटीलींकच्या तपोवन डेपोतील वाहक कर्मचारी आजही कामावर आले नाही, त्यामुळे शहरातील नागरिक प्रचंड मानस्तप व संताप व्यक्त करीत आहे. कारण त्यांची ससेहोलपट व पायपीट सलग तीन दिवस सुरू आहे.
शहराची life line म्हणून शहर बससेवेची ओळख आहे. सिटीलींकच्या बस कर्मचाऱ्यांना प्रशासनाने आश्वासन देऊनही वाहकांचे गेल्या 2 महिन्यांचा पगार अडकून आहे. यामुळे कर्मचाऱ्यांनी संपाचा पवित्रा घेतला आहे. परिणामी नाशिक शहरातील बससेवा विस्कळीत झाल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.
ही बस सेवा लवकरात लवकर पूर्ववत सुरू करावी ही मागणी नाशिकरांना व्यक्ती केली असून प्रशासन व वाहक कर्मचारी यांच्यात सामन्य नाशिककर पिचले जात आहे.
