नाशिक लासलगाव : दिनांक २४/०४/२०२४ रविवार रोजी होळीच्या शुभमुहूर्तावर लासलगाव येथील गणेश नगर येथे श्री गणेश मंदिरात हनुमान चालीसा पठणाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी बहुसंख्य महिला पुरुषांनी मोठ्या उत्साहाने या धार्मिक सोहळ्यात सहभाग घेतला. येथील श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्टच्या सचिव सौ. सुवर्णाताई जगताप, ॲड शेखर देसाई, नवनाथ श्रीवास्तव, अभिजीत लचके ,मनोहर खीलवाणी, कैलास जैन, पुजारी विवेक जोशी यांचे हस्ते सपत्नीक महाआरती करण्यात आली.
गेल्या वर्षी शहरात होळी ते हनुमान जन्मोत्सव हनुमान चालीसा पठण कार्यक्रम विविध ठिकाणच्या मंदिरांमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्याचा भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर सलग दुसऱ्या वर्षी देखील या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. २२ तारखेस आयोध्येत श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या मुहूर्तावर सुमारे ११ हजार भाविकांनी १ लाख हनुमान चालीसा मनोभावे पठण केले.
या धार्मिक सोहळ्यास परिसरसतील व अनेक गावातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते व श्री हनुमान जयंती पर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यास ही मोठ्याप्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.