राष्ट्रपती द्रौपदी मूर्म यांच्याहस्ते आज शनिवारी देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, पी. व्ही. नरसिंह राव, कृषी शास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामिनाथन, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आला.
पुरस्कार सोहळ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि अन्य उपस्थित होते.
राष्ट्रपती भवनात हा सोहळा आयोजित केला होता. चौधरी चरण सिंह यांचे नातू जयंत सिंह, पी. व्ही. नरसिंह राव यांचे सुपुत्र पी.व्ही. प्रभाकर राव आणि एम. एस. स्वामीनाथन यांची कन्या नित्या राव यांनी तर कर्पूरी ठाकूर यांचे सुपुत्र रामनाथ ठाकूर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
अडवाणी यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रविवारी राष्ट्रपती मुर्मू लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी भेट देतील आणि त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करतील हा निर्णय घेण्यात आला