गळ्यात कंठीमाळ घालून डोक्यावर 15,20 किलोचे ओझे घेऊन दररोज 20,25 कि.मी.
ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता. पोटासाठी, पोटाच्या गोळ्यांना दोन घास देण्यासाठी. हे काका Colony to Colony पायपीट करतात. तेही रोज घोटी नाशिक जाऊन येऊन. एवढे करून यांना मिळतात किती तर पाच सहाशे रुपये. मला वाटत पैशाच मोल यांच्यापेक्षा कुणाला अधिक असेल हो ?
वाईट तेव्हा वाटते जेव्हा आपण असेही लोक या समाजात पाहतो. ज्यांचा रोजचा सिगारेट, विडी, तंबाखू मद्यपानाचा खर्च यांच्या दुप्पट आहे. त्यांच्याकडे एवढा पैसा आहे की ते त्या द्वारे स्वतःचे व समाजाचे स्वास्थ्य खराब करतात. सगळं असून जीवनावर विश्वास नसणारी ही लोक. वरील कष्टकरी काकांच्या बरोबर किमान एक दिवस जरी फिरली तरी त्यांना देवाने किती भरभरून दिलं आहे याची जाण होईल हो पण शुद्धीत असल्यावर. जे अशक्य आहे कारण मद्याची नाही तरी पैशाची धुंदी असतेच की.
राहिले वरील काकांचे तर एकच सांगीन जीवन एवढे कठीण असूनही त्यावरचा विश्वास मात्र तसूभरही कमी झाला नाही त्यांचा.
शिरीष प्रभाकर चव्हाण
संपादक : दि सेपिअन्स न्युज