आज रोजी माजी आमदार व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते वसंत नुवृत्ती गिते यांच्या मुबई नाका येथील कार्यल्यावर महानगरपालिका नाशिक यांच्या अतिक्रमण विभागाने बुलडोजर फिरवला सदरची कारवाई ही मोठ्या पोलीस बंदोबस्त करण्यात आली.
मागील काही दिवसांपूर्वी मनपाने गीते यांच्या कार्यालयाबरोबरच परिसरातील अतिक्रमणाबाबत नोटीस बजावली होती. तेथे कोणत्याही प्रकारचे पक्के बांधकाम नसून केवळ एक पत्र्याचे शेड आहे. तसेच हे काम राज्य परिवहन महामंडळाच्या जागेत असल्याचे या नोटीसीत म्हटल्याचे बोलले जाते. त्यानंतर या कारवाईला माजी आमदार वसंत गीते यांच्या वतीने High Court आव्हान देण्यात आले होते.मात्र, न्यायालयात अद्याप सुनावणी होण्यापूर्वीच ही कारवा करण्यात आली आहे.