निफाड : निफाड पंचायत समितीचा वरिष्ठ सहाय्यक गणेश थोरात याला सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याचे वृत्त आहे. पंचायत समितीत निवृत्त झालेल्या १२ शिक्षकांच्या देय वेतनाची रक्कम २९१७०००रुपये परस्पर स्वतःच्या नातेवाईकांच्या नावावर ट्रान्सफर करून लाटल्याचा ठपका त्यावर आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाने केलेल्या चौकशीत व पंचायत समितीच्या अहवालात अनियमितता उघड झाली आहे. थोरात याच्यावर देयकात आर्थिक अनियमितता करणे, देयक गहाळ करणे, अनधिकृतपणे गैरहजर राहणे, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे हा ठपका ठेवत कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.