मुंबई आणि महाराष्ट्रात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबई, ठाणे परिसरात लाखो रुपयांचे बक्षीस असलेली उंच दहीहंडी फोडण्यासाठी संघांची झुंज पाहायला मिळाली. मुंबईत दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच दुसरीकडे काही गोविंदा फरशीवरून पडून जखमी झाले. त्यामुळे दहीहंडी उत्सवावर परिणाम झाला आहे. मुंबई आणि ठाण्यात आतापर्यंत 238 गोविंदा जखमी झाले आहेत. या गोविंदांवर सरकारी आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत मोठ्या उत्साहात पार पडलेल्या दहीहंडी उत्सवात आतापर्यंत 238 गोविंदा जखमी झाले आहेत. त्यापैकी 2 जणांवर ओपीडीमध्ये उपचार सुरू आहेत. तर 204 गोविंदांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ठाण्यात १९ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.