भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोल्हापुरात श्री करवीरनिवासिनी महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन व आरती केली. महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूर, वारणानगर, येथील श्री वारणा महिला सहकारी समुहाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभाच्या अध्यक्षस्थानी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू होत्या. यावेळी राष्ट्रपतींनी नवीन वारणा विद्यापीठाचे (डीम्ड विद्यापीठ) लोकार्पण केले. महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक आणि धैर्यशील माने, शाहूवाडीचे आमदार विनय कोरे आदी यावेळी उपस्थित होते.
3 सप्टेंबर रोजी, राष्ट्रपती पुणे येथे सिम्बायोसिस इंटरनॅशनल (डीम्ड युनिव्हर्सिटी) च्या 21 व्या दीक्षांत समारंभाला संबोधित करतील. त्याच दिवशी त्या मुंबई येथे महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमात सहभागी होतील.
4 सप्टेंबर रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते उदगीर, लातूर येथे बुद्ध विहाराचे उद्घाटन होणार आहे. उदगीर येथे महाराष्ट्र शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ आणि ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’च्या लाभार्थ्यांच्या मेळाव्यालाही त्या संबोधित करणार आहेत.