Active and passive income यातील फरक अनेक उच्च शिक्षित व्यक्तींना ही माहीत नसतात. महत्वाचे हे की आर्थिक प्रगतीसाठी हे माहीत असणे खूप महत्त्वाचे आहे आणि हो ते दोन्ही income सोर्स असणे ही आवश्यक आहे.
Active income : म्हणजे ज्या कामात तुम्ही प्रत्यक्ष involve असतात आणि ते नसल्यास तेथून येणारं उत्पन्न बंद होऊ शकते. उदा. नौकरी उद्योग व्यवसाय जो तुम्ही स्वत: करतात.
Passive income : असे उत्पन्न ज्यात तुम्ही स्वतः सहभागी नसतात पण ते एकदा केल्याने तुम्हाला नियमित उत्पन्न मिळते. उदा. दुकान वा घर भाडे, FD, shares, ETF, mutual fund, gold income थोडक्यात तुमचे पैसे काम करून तुम्हाला पैसे मिळवून देतात.
कमी अधिक प्रमाणात यात सर्वच येतात. पण तरी ही यातून सर्वच संपन्न नाही होत. त्याच एकच कारण active and passive income चा balance and proportion अनेकांना जमत नाही. जो वया नूरूप update करणे आवश्यक असते. कमी वयात active income आणि वाढत्या वयात passive income अधिक असते. कारण कमी वयात व्यक्ती फिजिकली फीट असतो आणि वाढत्या वयात व्यक्ती फिजिकली तेवढा फिट नसतो. कम्पॅरिटीवली जेवढा तरुण वयात असतो. म्हणून तरुण वयात active income 25% भाग हा भविष्यातील passive income साठी ठेवावा. जो पुढे जावून % ने कमी व amount ने जास्त असावा कारण नौकरित पगारवाढ होते. असे करण्या मागील एकच कारण की एकदम मनमारून ही जगणे नको कारण अगदी तरुण वयात नाही पण प्रौढ वयात तरी आनंद घेता यावा जर active and passive income चा balance तरुण वयात साधता आला तर जीवन धमाल जगता येतं कुणाची ही गुलामगिरी न करता. अगदी 45 वयाच्या आसपासच नौकरी सोडता येते आणि राहिलेचे आवडीचे काम करता येते. जे येणे खूप आवश्यक आहे. नाही तर जीवन व्यर्थ हो.