आज महाराष्ट्रात तीनच गोष्टी जोमात आहेत. मद्य, मांसाहार आणि पाकिटे कधी ही न पिणारी खाणारी ही पित खात आहे. सोशल मीडियावर प्रामाणिकपणाचे पोवाडे गाणारी मंडळी गुपचूप पाकीट घेत आहे. आज जनता तुपात आहे. दिवाळी ही जोमात आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मोठ्याप्रमाणात खेळते चलन मार्केटमध्ये आले आहे करोडो रुपये सापडता आहे आणि अब्ज वाटली जात आहे. परंतु या सर्व आनंदी आनंदात फक्त एक प्राणी दुःखी, चिंताग्रस्त, थकलेला आहे तो म्हणजे राजकारणी. तो असा जुगारी डाव खेळतो आहे ज्यात डावावरील एकच जिंकणार आहे. त्या डावावरील प्रत्येकाला जनता emotionally blackmail करीत आहे. या सर्वांना माहीत आहे त्यांच्या जवळ आज असलेले बहुसंख्य स्वार्थी आहेत. त्यातील बरेच चार ठिकाणी फिरून आम्ही तुमचेच सांगून आली आहे. त्यांची ती भूक ही खूप तीव्र आहे कारण ते गेली पाच वर्षे उपाशी आहेत. म्हणूनच त्यांना प्रीपेड चालते पोस्टपेड नाही. कारण ते सर्व आजमध्ये जगतात त्यांचा डावावर बसलेल्यांवर अजिबात विश्वास नाही. आलेले सारखी भूक भूक करता आहे यात तसे निष्ठावंत कमीच आहे. बहुतांश उंबऱ्याच्या आत विचार करणारी लोक आहेत त्याबाहेर काही ही झाले तरी त्यांना देणे घेणे नाही परंतु आजही दोन्ही बाजूकडे अशी ही मंडळी आहे. ज्यांना देशाची फिकीर आहे. आणि हेच या देशाचं सुदैव
टीप : नेहमीच राजकारणी दोषी नसतात.
संपादक : शिरीष प्रभाकर चव्हाण (दि.सेपिअन्स न्युज)