मिडल क्लास माणसाची सर्वात विचित्र गोष्ट काय माहीत आहे ? मध्यमवर्गीय व्यक्तीस स्वप्ने पाहणे स्वःतास अपग्रेड करणे आवडते. खरंतर तो त्यासाठी खूप कष्ट ही वेचतो परंतु त्याचं प्रक्रियेत जर एखादी चूक झाली तर जीवनाचे गणित बिघडते. मग त्याला आहे तिथे ही राहणे अवघड होते. जे त्याच्या व त्याच्या कुटुंबाच्याही दृष्टीने अतिशय जीवघेण असतं वाईट हे की त्यातून आलेलं खड्ड भरण्यासाठी तो आणखी चुका करतो अनेकदा त्याच वर्तन चुकतं आणि एक प्रामाणिक माणूस वारंवार होणाऱ्या चुकांमुळे समाजात खोटा ठरू लागतो. पर्यायाने बदनाम होतो आणि त्यातूनच एक नैराश्य येतं जे एकदिवस त्या सुंदर घराला खातं. कारणं काय तर श्रीमंत होण्याचे असंख्य स्वप्न पाहणारा मध्यमवर्गीय सामन्य माणूस ते तुटलेले पाहू शकतच नाही. त्याच गरिबीकडे जाणार वर्गीकरण त्याला पचन खूप अवघड जात, जिव्हारी लागतं.
मग प्रश्न हा की मध्यमवर्गीय व्यक्तीने स्वप्नच पहायची नाही का ? तर पहायची नक्कीच पहायची पण ते पाहतांना आधी दोन गोष्टी करायच्या. एक खिशाची खोली तपासायची. दोन जर त्याच स्वप्न तुटलच तर येणाऱ्या परिस्थीतीला कसं सामोर जायचं याचा आधी विचार करायचा.
