गृहविभाग हा शासकीय यंत्रणेचा व समाज नियंत्रणाचा आत्मा आहे. या विभागाची financial productivity जरी नसली तरी जेही विभाग मग ते शासकीय असो की खाजगी यावर नियंत्रण ठेऊन त्यांच्याकडून by hook by crook कामे करून घेण्याची व न केल्यास कायद्याचा बडगा वा ससेमिरा त्यांच्या मागे लावण्याची क्षमता फक्त एकमेव पोलीस विभागात आहे. अगदी ED, CBI वा आणि कुणी असो स्थानिक पातळीवर कारवाई करण्यासाठी त्यांना पोलीस विभागाचीच मदत घ्यावी लागते. तसेच या विभागाला संविधानिक अधिकार ही मोठे आहे. यासाठीच निवडून आलेल्या प्रत्येक पक्षाचा या विभागावर डोळा असतो. पोलीसांचा ताबा ज्यांच्याकडे तो खरा राजा. म्हणून BJP मुख्यमंत्री पद ठेऊन घेऊन ही गृहमंत्री पद ही स्वतःकडे ठेवू पाहत आहे.
टीप : गृहमंत्री पदाचा जेवढा अस्खलित व पुरेपूर वापर फडणवीस यांनी केला तेवढा कदाचित फक्त भुजबळांनीच केला असेल. आता हा संशोधनाचा विषय असू शकतो की तो विधायक होता की……
शिरीष प्रभाकर चव्हाण : संपादक : दि. सेपिअन्स न्युज