गाडी नवी घ्यावी की जुनी ? गाडी नवी घ्यावी की जुनी ? जुनी गाडी जुनी पाहण्यातील व छान स्थितीतीत मिळाली नाही तर नवीच घ्यावी. त्याच एकमेव कारण की नव्या गाडीची किंमत जरी अधिक असेल तरी किमान डाऊनपेमेंट करून तुम्ही नवी गाडी घेऊच शकता बाकी लोन आहे. उदा. 10 लाखांची नवी गाडी असेल तर तुम्हाला 3 लाख डाऊनपेमेंट करून नवी गाडी मिळते 7 वर्षांसाठी 8 लाख जरी लोन घेतले तरी EMI 12600 येतो. तेच तीच जुनी गाडी 7 लाखात जरी मिळाली तरी एक रक्कमी 7 लाख द्यावे लागतात. त्यातून नव्या गाडीसाठीचे डाऊनपेमेंट 2 लाख जरी वजा केले तरी वाचतात 5 लाख आणि तेच 5 लाख एखाद्या साधारण फंडमध्ये जरी टाकले तरी 7 वर्षात 5 लाखांचे होता 11 लाख आणि नव्या गाडीचे व्याज जाते 2.31 लाख. म्हणजे निव्वळ नफा होतो 3.50 लाख त्यात नवी कार म्हणजे समाधान आणि किमान 15 वर्ष तरी किटकीट नाही. म्हणून नवी कार घ्याची. एक सांगू नव्या गोष्टी आपल्याबरोबर शुभेच्छा ही घेऊन येता. भले ही छोटी घ्या पण नवीच घ्या.
