The Sapiens News

दि.सेपियन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपियन्स न्युज

शिवसेना संपर्क प्रमुख प्रवीण शिंदेंच्या आंदोलनाला यश

कोपरगाव तालुक्यातील रवंदे विद्युत उपकेंद्राचा मंजुर असलेला पाच एम.व्ही.ए. उच्च दाबाचा ट्रान्सफॉर्मर महावितरणने उपकेंद्रामध्ये बसविण्यास सुरुवात केल्यामुळे ठाकरे शिवसेनेचे
संपर्कप्रमुख प्रविण अप्पासाहेब शिंदे यांनी यांचे प्रस्थावीत आमरण उपोषण मागे घेतले असून यांच्या आंदोलनाच्या व उपोषणाच्या इशाऱ्याने शासकीय यंत्रणा कार्यतत्पर झाल्याचे दिसून येते. प्रवीण शिंदे यांनी व ग्रामस्थानी केलेल्या इतरही विविध मागण्यांचा विचार प्रशासन गांभीर्याने करीत असल्याचे खात्रीपूर्वक समजते.


येथे हे नमूद करणे क्रमप्राप्त होते की प्रत्येक वेळी सामान्य व साध्यासाध्या कामाकरिता आंदोलने व उपोषणे करण्याची वेळ का यावी ? आज संबंधित परिसरात प्रवीण शिंदेंसारखे पदाधिकारी लोकनेते हे वेळोवेळी जनकार्या करिता रत्यावर उतरता म्हणून काही प्रमाणात का होईना यंत्रणा कामे करते. अशी अनेक गावे आहेत जेथे जनसमन्यांच्या अगदी छोट्या छोट्या मागण्यांना केराची टोपली दाखवल्या जाते हे येथे नमूद करणे क्रमप्राप्त आहे.

तरी देखील दि. सेपियन्स न्युज समाजसेवी व जननेते प्रवीण शिंदे व परिसरातील आंदोलक तसेच ग्रामस्थ यांना शासनाकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादा करिता अभिनंदन करतो.

शिवसेना नेते प्रवीण शिंदे व सहकारी

Vote Here

[TS_Poll id="1"]
UPSE Coaching

Recent Posts