The Sapiens News

The Sapiens News

TSN युवा : “उच्च नाही योग्य शिक्षित” अमोल गायकवाड story

( संपादकीय )

आम्ही नवी कार घेतली नी तिचे सिट कव्हर व मॅटिंगसाठी एका तरुणाला काम दिले. ऐकले होते की तो योग्यदरात घरी येऊन हे काम करतो. तो जेव्हा भेटला तेव्हा लक्षात आले त्याला धड वाचताही येत नाही. अधिकची चौकशी केली तर कळले की त्याने परिस्थिती व शाळेतील काही कळत नसल्याने शाळाच सोडली. मी मग पुढचा प्रश्न केला. कमावतो किती तर कळले 60 हजारच्या आसपास दरमहा. मी ही विचारात पडलो कारण नवी गाडी घेतली तेव्हा इंजिनिअरिंग झालेले मुले पहिली. जे अगदी 15 हजारांवर 12,12 तास झिजता आहे आणि हा मुलगा कुणाची चाकरी न करता जगाला आवश्यक skill शिकून वयाच्या 14,15 वर्षांपासूनच अतिशय गरिबीत असलेल्या व धुणीभांडी व मिळेल ते काम करणाऱ्या आईवडिलांना मदत करतो आहे. तो नुसती मदतच नाही करीत तर स्व:ताला आवश्यक व जगाला दाखविण्यासाठी जे ही पाहिजे ते सर्व त्याकडे आहे. त्याच्या म्हणण्यानुसार ही सुरवात आहे अजून खूप काही छान व्हायचे आहे. पण हे सांगताना तो गंगेवर रामकुंड परिसरात ज्या हलाखीत राहिला ते दिवशी विसरत नाही.
आत्ता आपल्याला जो प्रश्न पडला आहे तो मलाही पडला आहे की मग शिक्षणाचे महत्व तरी काय ? उत्तर हे आहे की उच्च शिक्षणापेक्षा योग्य शिक्षण मिळने व घेणे आवश्यक आहे जे पोटाची खळगी भरण्यास उपयुक्त ठरेल दुर्दैव हे की आजही पालक व मुले उच्च शिक्षण घेण्यात धन्यता मानतात आणि योग्य व आवश्यक शिक्षण नक्कि काय असते हे ना त्यांना कळते ना त्यांची ते समजून घेण्याची इच्छा असते. जरी कळले तरी ते त्याला कमी लेखात मग एक दिवस असा येतो जेव्हा सुटाबुटात फिरणारी बहुतांश मुले नैराश्यात कर्जात असतात आणि मातीपासून जमिमीवरून सुरवात करणारी ही समाजाच्या नजरेत अशिक्षित पण आमच्या नजरेत योग्य शिक्षित मुले समृद्धीत

टीप : अमोलचे दुकान नाशिक येथील शिंगाडा तलाव येथे आहे अमोल कुशन या नावाने नी त्याचा cell न. आहे. +91 98818 09861
सूचना : ही poat व्यवसायिक नाही.

शिरीष प्रभाकर चव्हाण
संपादक : दि. सेपियन्स न्युज 

Leave a Comment

Vote Here

Loading poll ...
Coming Soon
Do You Like Our Website?
UPSE Coaching

Recent Posts