The Sapiens News

The Sapiens News

संपादकीय : आठवण, नाशिकला स्वच्छ करणाऱ्या आयुक्त कुलवंत सरंगल यांची

कहाणी एका जाबाज पोलीस अधिकाऱ्यांची ज्याने 2012 मध्ये असलेली नाशिकची गुन्हेगारी संपुष्टात आणली

फेब्रुवारी 2012. नाशिक पोलीस आयुक्त पदाचा पदभार एका जाबाज पोलीस अधिकाऱ्याने घेतला. नाव होते कुलवंत सरंगल. असे म्हणा त्यावेळी गुन्हेगारीने पुरते गलिच्छ झालेले नाशिक स्वच्छ, सुरक्षित व सरळ करण्यासाठीच या अधिकाऱ्यांची बदली येथे करण्यात आली होती. सरंगल यांनी चार्ज घेतला त्यावेळी नाशिकचा क्राईमरेट राज्यात अव्वल होता. जसा आज आहे. किंबहुना याही पेक्षा मोठा. कारना त्यावेळी वाद,भांडणे,चोऱ्या,दरोडे,घरफोडी,खून,अपहार,
अवैद्य धंदे यांनी पुरते नाशिक ग्रासले होते. सुरक्षितता, कायदा व सुव्यवस्था नावाचा प्रकार जणू नाशिककर विसरले होते. त्यात या गोऱ्याचीट्ट्या हातातकडे घातलेल्या उत्तर भारतीय अधिकाऱ्यांची इन्ट्री झाली आणि नाशिक मिनिरल वाटरसारखे स्वच्छ होण्यास सुरुवात झाली.

मग असं काय केलं त्यांनी की नाशिकचा crime rate एकदम उतरला ? तर त्यांनी एकच गोष्ट केली ज्याला community policy म्हणतात. ज्यात सर्वप्रथम त्यांनी पोलीस माणसात एक पोलीस असल्याचा अभिमान व विश्वास जागृत केला. जे पोलीस अनेक वर्षांपासून पोलीस ठाण्यात बसून ढेपाळले होते. त्यांना टापटीप करून रत्यावर आणले. त्यातल्या त्यात धिप्पाड व फिट पोलीसांचा प्रत्येक पोलीस ठाण्यात गट तयार केला. जो हद्दीत सर्वाधिक ऍक्टिव्ह होता. आता पावलो पावली पोलिसांची उपस्थिती असल्याने दोन गोष्टी झाल्या एक सामान्य माणसात आत्मविश्वास आला. दोन गुन्हेगार निदान उघडपणे व राजरोसपणे गुन्हा करण्यास धजावत नव्हते. त्याने एकदम गुन्ह्याचे प्रमाण कमी झाले. तरीही अट्टल गुन्हेगार सक्रिय होतेच त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करीत त्यांना lockup मध्ये टाकण्या आधी त्यांची धिंड काढली त्याच बरोबर त्यांना पोलीस ठाण्यात जो चोप दिला त्याची जाहिरात अप्रत्यक्षपणे करवून घेतली. ज्याने इतर गुन्हेगारात एवढी जरब बसली की त्यांनी एकतर नाशिक सोडणे पसंत केले अथवा गुन्हेगारी.

येथेवरच सरंगल सर थांबले नाही त्यांनी प्रत्येक भागात पोलीस पाठवून जनतेशी संवाद साधला त्याने जनतेत वा कायदा पाळणाऱ्या माणसात पोलिसांना मदत करण्याची इच्छा व विश्वास निर्माण झाला. म्हणूनच लोक गुन्हेगारी रोखण्यासाठी स्वतःहून पुढे आले नी पोलिसांना मदत करू लागले. त्यासाठी करण्यात आलेल्या अनेक कृतींपैकी एक कृती जी अतिशय प्रभावी ठरली ती म्हणजे CBS जवळ एका पोलिसांवर एका राजकीय गुंडाने हात उचलला ते जेव्हा सरंगल सरांना समजले त्यांनी तात्काळ तेथे पोहोचून त्या गुंडास भर रत्यात पब्लिक समोर बेदम मारले. एवढ्यावरच ते थांबले नाही त्याला Central Jail ची ही हवा खाऊ घातली. याचा परिणाम असा झालं की पोलीस जे नेहमी वरिष्ठ साथ देत नाही याची तक्रार करतात त्यांना हा विश्वास आला की हा अधिकारी वेगळा आहे जो मात्र AC त बसून आदेश न देता आपल्यासाठी रत्यावर उतरतो. त्या घटने पासून प्रत्येक पोलीस जोमात काम करू लागला. त्यांना ही पोलिसिंग करण्याचे समाधान व जनतेकडून सन्मान मिळू लागल्याने ते विना लोभ व लाचखोरी न करता जनतेसही मनापासून मदत करू लागले.

येथे सरंगल साहेबांबरोबर एका अधिकाऱ्यांचे नाव आवर्जून घ्यावं लागेल ज्याचा दरारा आयुक्तांन एवढाच होता आणि कष्ठ ही. ते म्हणजे सहायक आयुक्त स्वामी साहेब या दोघांची टीम नाशिकच्या पोलीस वर्तुळातील सर्वात प्रभावी टीम असावी. म्हणून सॅल्युट अशा पोलीस अधिकाऱ्यांना. आजही नाशिक त्यांच्या सारख्या कडक पोलीस अधिकऱ्यांच्या प्रतीक्षेत आहे. आणि आज अशाच अधिकाऱ्यांची नाशिकला गरज आहे. कारण आज माझे, आपले सुंदर नाशिक पुन्हा गलिच्छ झाले आहे खूप खूप गलिच्छ आणि हो त्याला स्वच्छ नी सुंदर करण्याची जबाबदारी केवळ पोलिसांचीच नाही त्या प्रत्येक नाशिककराची आहे जो या आपल्या नाशिकवर मानपासून प्रेम करतो.

लेखक
शिरीष प्रभाकर चव्हाण
संपादक : दि. सेपियन्स न्युज

Leave a Comment

Vote Here

UPSE Coaching

Recent Posts