The Sapiens News

दि.सेपिअन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपिअन्स न्युज

नीता अंबानी आणि श्रीमंतांची हुशारी

जी गरिबात नाही !

नीता अंबानींचा एक बॅग्स सह Pic आहे आणि ती बॅग आहे birkin या ब्रँडची किंमत किमान 20 ते 25 लाख आता आपल्याला हा मुर्खपणा वाटेल. का तर एवढी महागडं  बॅग का  घ्यायची. तर हा मुखपणा अजिबात नाही आणि ते जर मूर्ख असते तर आपल्यावर राज्य केले नसते. हे लोक आपल्या विचारांच्या पुढे प्रॉफिटचा विचार करतात अगदी प्रत्येक गोष्टीत. आता birkin च्या बॅगचे सांगतो. ही जुनी बाग जेव्हाही विकायला येते तेव्हा तिची किंमत जवळ जवळ डबल मिळते कारण ते प्रत्येक बॅग ही युनिक आणि स्पेशल एडिशन म्हणून बनवतात आणि स्पेशल लोकांसाठी ही. या सर्व गोष्टी जेव्हा त्या बॅगला जोडल्या जातात तेव्हा तिची साहजिकच डबल किंमत होते. आता राहिले अंबानी अधिक खर्चिक की आपण. तर आपण कारण आपण सोने जरी घेतले आणि ते विकायला गेलो तरी बाजारभावाच्या 2,3% पैसे कपात होतात. तेही सोडा प्रत्येक खरेदी आपली ही कर्जाची असते जर आपण जी 10 लाखाची गाडी घेतोना ती खरतर 10 लाखाची नसते. ती असते 10+बँकेचं व्याज यावर ही जेव्हा ती विकायला जातो तेव्हा 50% किंमत कमी मिळते आणि श्रीमंतांच्या बॅगची किंमत देखील डबल होते. एक फरक आणखी अंबानींची संपत्ती 92,00,00,00,00,000 आहे. त्यातून 2500000 गेले तर त्याचा टक्का होतो 0.00002% आता आपल्या बायकोच्या बॅगचे. सामन्यत आपले वेतन असते 80000 आणि बायकोची बॅग असते 2000 ची मग याचे किती टक्के होतात. तर 2.5 आता कुठे अंबानीचे 0.00002% आणि आपले 2.5 टक्के हो तरी आपण अंबानी खर्चिक आहे म्हणतो. तो तर आपल्यापेक्षा ही गरीब की. त्यातही बॅग अशीच घेतो जी विकल्यावर डबल पैसा देईल कंजूस कुठला.