(नाशिक) सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी नाशिकच्या तपोवन परिसरात साधुग्राम उभारण्याची योजना असल्याने, तेथील प्रस्तावित वृक्षतोडीला पर्यावरणवाद्यांकडून तीव्र विरोध होत आहे. या साधुग्रामसाठी तपोवनमधील जवळपास १८०० झाडे तोडावी लागणार आहेत. पर्यावरणवाद्यांचा या वृक्षतोडीला विरोध आहे.
या पार्श्वभूमीवर, तपोवनमधील प्रस्तावित वृक्षतोडीला विरोध होत असताना, दुसरीकडे हैदराबादमधील राजमुंद्री येथून झाडे मागवण्यात आली आहेत. याच पार्श्वभूमीवर, राजमुंद्रीहून पाठवलेली १५,००० झाडे आता नाशिकमध्ये दाखल झाली आहेत. गिरीश महाजन यांनी स्वतः राजमुंद्री येथे १५,००० स्थानिक झाडांची निवड केली होती. ही झाडे शहराच्या विविध भागांमध्ये लावली जाणार आहेत.
वड, पिंपळ, कडुलिंब, जांभूळ यांसारखी झाडे लावली जाणार असून, सुरुवातीला १५,००० झाडे लावण्यात येतील. सोमवारी नाशिकमध्ये १५,००० झाडे लावली जाणार आहेत आणि यामध्ये, तपोवनमधील वृक्षतोडीला १५ जानेवारीपर्यंत अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे. ‘ग्रीन नाशिक’ अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम आज मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे. पहिल्या टप्प्यात १५,००० झाडांचे रोपण आज केले जाईल.
नाशिकच्या तपोवनमधील झाडं तोडण्याचा मुद्दा तापला आहे. 2027 साली नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. यासाठी नाशिकच्या तपोवनमध्ये साधुग्राम बांधण्यात येणार आहे. या साधुग्रामसाठी झाडं तोडण्यात आली आहेत. जवळपास 1800 झाडं तोडण्यात येणार आहेत. पर्यावरणप्रेमींचा याला विरोध आहे. जी झाडं तोडण्यात येणार, त्याजागी नव्या झाडांची लागवड करण्यात येईल असं सरकारकडून सांगण्यात येत आहे. आजपासून 15000 झाडांच्या वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरु झाला आहे. या कार्यक्रमाला गिरीश महाजन तसेच अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रमुख साधू महंत उपस्थित आहेत. त्र्यंबकेश्वरच्या 10 तसेच नाशिकच्या 3 आखाड्यांचे प्रमुख उपस्थित आहेत. शहरात चार वेगवेगळ्या ठिकाणी 15000 वृक्ष लावले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात 1000 वृक्षांचे रोपण होणार आहे.



