भारताच्या राष्ट्रपती, श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आज (१६ डिसेंबर २०२५) विजय दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात ‘परमवीर दीर्घा’चे उद्घाटन केले.
या दीर्घांमध्ये सर्व २१ परमवीर चक्र विजेत्यांची छायाचित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत. आपल्या राष्ट्राचे रक्षण करताना अदम्य निर्धार आणि अजिंक्य भावना दाखवणाऱ्या आपल्या राष्ट्रीय नायकांबद्दल अभ्यागतांना माहिती देणे, हा या दीर्घेचा उद्देश आहे. मातृभूमीच्या सेवेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या आपल्या शूरवीरांच्या स्मृतीचा सन्मान करण्याचा हा एक उपक्रम आहे.
ज्या दालनांमध्ये आता परमवीर दीर्घा तयार करण्यात आली आहे, त्या ठिकाणी पूर्वी ब्रिटिश एडीसींची (सहाय्यक अधिकाऱ्यांची) छायाचित्रे लावलेली होती. भारतीय राष्ट्रीय नायकांची छायाचित्रे प्रदर्शित करण्याचा हा उपक्रम म्हणजे वसाहतवादी मानसिकता सोडून भारताच्या संस्कृती, वारसा आणि कालातीत परंपरांच्या समृद्धीचा अभिमानाने स्वीकार करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
परमवीर चक्र हे भारताचे सर्वोच्च लष्करी पदक आहे, जे युद्धादरम्यान अतुलनीय शौर्य, धैर्य आणि आत्मत्यागाचे प्रदर्शन केल्याबद्दल प्रदान केले जाते.




