आताच दिग्गज फुटबॉल खेळाडू मेस्सी भारतात आलेला. त्याच्या स्वागतासाठी पान मसाल्याची add करणारे, गलिच्छ राजकारण करणारे, कोणतीही पत नसताना अल्लडपणा करीत केवळ नवऱ्याच्या पदाचा फाफट पसारा करणारे लोक चटकन pic काढताना आपण पाहिले आणि त्यांची छी थू होतानाही. पण या भाऊगर्दीत एक व्यक्ती अतिशय निमूटपणे स्टेजच्या खाली उभा होता खरतर तोच स्टेजवर असायला हवा होता. कारण अर्जेंटिनासाठी जसा मेस्सी, ब्राझीलसाठी मॅराडोना, पोर्तुगालसाठी रोनाल्डो तसाच भारतासाठी हा. अतिशय उच्च गुणवत्तेचा महान खेळाडू नाव सुनील छत्री. पण शो ऑफ करणाऱ्यांच्या गर्दीत तो मावळून टाकला. परंतु जेव्हा मेस्सी त्याच्या देशात गेला तेव्हा त्याने एक मिनिटाचा विशेष व्हिडिओ पोस्ट केला. त्यात मात्र या खेळाडूचा विशेष आदर करण्यात आला आहे आणि नकोत्या लोकांना विशेषतः राजकारण्यांना त्यांना फाट्यावर……
एक सांगू आपल्या गुणवत्तेची दखल नेहमी घेतलीच जाते असे नाही कारते काम निकृष्ट गुणवत्तेची लोक करूच शकत नाही. त्यासाठी मोठे मन हवे असते. जे केवळ गुणवत्तेने मोठ्या असलेल्या लोकांकडे असते. म्हणून मान सन्मान मिळण्याची अपेक्षा देखील अशाच लोकांकडून कारवी ज्यांची स्वतःची गुणवत्ता मोठी आहे जे आपल्या महान फुटबॉल खेळाडू सुनील छोत्रिला कळते. म्हणून ते स्टेज खाली उभा राहिला अतिशय नम्रपणे. ज्याचे कौतुक जनतेने केले पण त्याला स्टेजवर बोलविण्याचे मोठेपण कुणी दाखविले नाही पण मेस्सीने त्याला ते स्थान व आदरही दिले…….





