थोडक्यात घटना अशी : यातील तक्रारदार यांच्या विवाहित मावस बहीण सध्या रा. अहिल्यानगर यांचेकडे जन्मदाखल्याची प्रत उपलब्ध नसल्याने दाखला मिळणे करिता विभागीय कार्यालय, नाशिक महानगरपालिका नाशिकरोड येथे चौकशी केली असता त्यांना सांगितले की ज्या हॉस्पिटलमध्ये जन्म झाला त्या डॉ. कडून लिहून आणा. त्या प्रमाणे श्री हॉस्पिटल यांनी तसे पत्र दिले होते तेव्हा तिथे असलेला खाजगी व्यक्ती हारिष पत्की याने तक्रारदार व त्यांच्या मावस बहीण यांचे समक्ष सांगितले की माझी नाशिकरोड महापालिकेतील जन्म मृत्यू विभागात ओळख आहे. मला 5000/-रु. द्या. मी दाखला काढून देतो. तुम्ही कार्यालयात जाऊन फक्त अर्ज द्या असे सांगून खाजगी इसम यांनी तक्रारदार यांच्याकडे 5000रु. लाचेची मागणी करत असल्या बाबत ची तक्रार दिनांक 23/12/25 रोजी समक्ष ला. प्र. वि. नासिक कार्यालयात दिली होती.
सदर तक्रारीवरुन दिनांक 23/12/2025 रोजी पडताळणी केली असता खाजगी हरीश पक्ती यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचांसमक्ष 5000/-रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती 4000/-रुपये लाच स्विकारण्याचे मान्य केले होते. दिनांक 24/12/2025 रोजी लाचेचा सापळा आजमावणी केली असता पक्ती याने मागणी केल्याप्रमाणे 4000/- लाच स्विकारली. त्यानंतर पक्ती याने त्याचे भ्रमणध्वनी वरून आलोसे क्र 1 कैलास मधुकर साळवे यास संपर्क केला व तक्रारदार याचेकडून लाचेची रक्कम स्कीकरल्याचे सांगितले. त्यास साळवे याने प्रोत्साहन दिले. सदर संभाषनादरम्यान तक्रारदार यांनी देखील आलोसे क्र 1 कैलास मधुकर साळवे याला त्यांच्या बहिणीच्या जन्म दाखल्याचे काम केले म्हणून पक्ती याला त्याने मागणी केल्याप्रमाणे 4000/- रु दिले असे सांगितले असता साळवे यानी बर बर ठीक आहे चालेल असे सांगून लाचेची मागणी व स्विकारण्यास प्रोत्साहन दिले म्हणुन गुन्हा त्यावर व खाजगी इसमावर उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाईत सहभागी अधिकारीं व कर्मचारी :
सापळा अधिकारी : श्रीमती. स्वाती पवार, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक पो.हवा./ शरद हेंबाडे,
पो.हवा./ युवराज खांडवी, चा.पो.ना./ परशुराम जाधव.
श्री. एकनाथ पाटील, पोलीस उपअधीक्षक, ला. प्र वि. नाशिक,
एम.श्री. भरत तांगडे, पोलिस अधीक्षक, एल.पी.व्ही., नाशिक झोन, नाशिक मा.श्री. माधव रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र, नाशिक मा.श्री. सुनील दोरगे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र, नाशिक.





