जुनी पेन्शन योजना लागू करणे तसेच जीपीएफ चे खाते उघडण्याकरिता प्रत्येकी दहा हजार रुपये लाज मागितल्या प्रकरणी
तक्रारदार हे दिनांक २४/११/२००५ रोजी पासून शिक्षक म्हणून नेमणुकीस आहेत ते नोकरीस लागले तेव्हा जुनी शासकीय पेन्शन योजना बंद झाली होती. मा. उच्च न्यायालय नागपुर खंडपीठ यांनी त्यांचेकडे दाखल याचिकेतील काही शिक्षकांना त्यांचे भरती बाबत जाहिरात आक्टोंबर २००५ पुर्वी काढण्यात आली होती या आधारावर जुनी पेन्शन योजना लागु करण्याबाबत निर्णय दिला होता. मा. उच्च न्यायालय खंडपीठ नागपुर यांनी दिलेल्या निर्णयाचे अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने ज्या शासकीय नोकरदारांची भरती बाबत जाहिरात आक्टोंबर २००५ पुर्वी काढण्यात आली होती त्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्याबाबत जीआर काढलेला आहे. त्या अनुषंगाने जुनी पेन्शन योजना लागु करणे बाबत तक्रारदार व इतर शिक्षक यांनी मा. प्रशासनाधिकारी, मनपा शिक्षण मंडळ, मालेगाव महानगर पालिका यांचे नावे दि. २१/०२/२०२४ रोजी अर्ज दिला होता. तक्रारदार यांनी दिलेल्या अर्जानुसार तक्रारदार व इतर यांना जुनी पेन्शन योजना लागु करून तक्रारदार तसेच इतर शिक्षकांचे जीपीएफ अकाउंट उघडुन जुनी पेन्शन योजना सुरू करणेबाबत टिपण्णी प्रस्ताव तयार करून मा. आयुक्त मनपा मालेगाव यांचेकडे सादर करण्याचे मोबदल्यात बक्षिस म्हणुन लोकसेवक श्री. चंद्रकांत दौलत पाटील, प्रशासनाधिकारी, शिक्षण विभाग हे तक्रारदार यांचेकडे स्वतः साठी प्रति शिक्षक १०,०००/- रु असे एकुण २,००,०००/- रू. लाचेची मागणी करत असले बाबत ची तक्रार दिनांक ०७/०८/२०२५ रोजी ला. प्र. वि. नाशिक कार्यालयास दिली होती.
तक्रारदार यांनी दिलेल्या अर्जानुसार तकारदार व इतर यांना जुनी पेन्शन योजना लागु करून तकारदार तसेच ईतर शिक्षकांचे जीपीएफ अकाउंट उघडुन जुनी पेन्शन योजना सुरू करणेबाबत टिपण्णी/प्रस्ताव तयार करून मा. आयुक्त प्रशासन साहेब म.न.पा. मालेगाव यांचेकडे सादर करण्याचे मोबदल्यात बक्षिस म्हणुन लोकसेवक श्री. चंद्रकांत दौलत पाटील, व्यवसाय नोकरी पद प्रशासनाधिकारी, शिक्षण विभाग, महानगर पालिका, मालेगाव यांनी दि. ०७/०८/२०२५ रोजी पंच साक्षीदार यांचे समक्ष तक्रारदार यांचेकडे स्वतः साठी प्रति शिक्षक १०,०००/- रु असे एकुण २,००,०००/-रू, लाचेची मागणी स्विकारण्याची तयारी दर्शवली असुन
संपादक : शिरीष प्रभाकर चव्हाण The Sapiens News




