50 एक वर्षापूर्वी अमेरिकेत टोबॅको उत्पादकांची एक मीटिंग झाली. त्यात ग्राहक कसे वाढतील यावर मंथन झाले. त्यात एका सिगारेट बनविणाऱ्या व्यावसायिकाने केवळ पुरुषच आपले ग्राहक असल्याने लिमिटेशन आहे म्हणून नवीन ग्राहक जोडणे अवघड असल्याचे सांगितले. त्यावर उपाय काय या गहण प्रश्नाचे उत्तर एका चलाख व्यावसायिकाने एक प्रश्न विचारून दिले. प्रश्न होता आपले ग्राहक पुरुषच का आहे महिला का नाही ? त्यावर इतर व्यावसायिक म्हणाले कारण आपले उत्पादन केवळ पुरुषांसाठीच आहे. त्या चलाख माणसाचे उत्तर होते. असे आपण समजतो ज्या दिवशी आपण स्त्रिया ही सिगारेट पिऊ शकता हे स्वतःला पटवून देऊ तेव्हा नक्कीच आपले ग्राहक स्त्रिया देखील होतील आणि लागलीच काही काळात आपला व्यवसाय तब्बल 50% ने वाढेल 50% वाढीची लालूच सर्वानाच पटली आणि त्यांनी त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू केले. त्यांना हे लक्षात आलं की समाजात डोमेस्टिक व्हायलंस खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचे बळी स्त्रीच आहेत ती संधी दवडेल ते व्यावसायिक काय ? त्यांनी पीडित असलेल्या महिलांचा शोध घेतला आणि त्यांना सांगितलं तुम्हाला स्वातंत्र हवे असेल तर पुरुषी उत्पादन असलेली सिगरेट हातात घ्या आणि पुरुषांची मक्तेदारी मोडून काढा. हा एक भावनिक कावा होता त्या संतप्त महिलांनी सार्वजनिक ठिकाणी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा निषेध म्हणून सिगरेट हातात घेतली आणि काहींनी ओढली देखील हे दृश्य सामाजिक स्तरावर उलथापालक करणारे ठरले आणि पुढे जाऊन काही दिवसात ज्या महिलांवर अन्याय देखील झाला नव्हता त्यांनी देखील स्त्री शक्तीचा नारा देत सिगारेट ओढायला सुरुवात केली. या घटनेने महिलांवरचे अन्याय किती कमी झाले हा संशोधनाचा विषय असला तरी सामाजिक स्तरावरती तीन गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या 1 तंबाखूचे उत्पादक आणि व्यावसायिक हे खूप श्रीमंत झाले 2 स्त्रियांमध्ये देखील कर्करोग मोठ्या प्रमाणात आढळून लागला 3आयान बरोबर मुलांनाही धुम्रपानाचे व्यसन जडले. हे केवळ महिलांना टार्गेट केल्याने झाले त्यांच्या मते महिला भाऊक असतात आणि त्याचाच फायदा त्यांनी उचलला. आणि आज तेच इराणमध्ये सुरू आहे सिगारेट पिणाऱ्या या तरुणी त्या आहे ज्यांच्या आई आणि आजीने स्वतःहून 30-40 वर्षांपूर्वी कट्टरवाद हिजाबच्या माध्यमातून ओढून घेतला आणि त्यांच्याच मुली तो कट्टरवाद जाळू पाहत आहे. परंतु अतिशय चुकीच्या पद्धतीने सिगारेट पिऊन.
सारांश : कोणत्याही देशाचा समूहाचा घडामोडीचा क्रांतीचा युद्धाचा शांतीचा प्रगतीचा सामान्य स्थितीचा फायदा किंवा तोटा कुणाला हो अगर ना हो परंतु नफ्यात नेहमी भांडवलशा आणि उद्योजकच राहतात ही गोष्ट ध्यानी यायला हवी…..
संपादक : शिरीष प्रभाकर चव्हाण : The Sapiens News





