. २०/०१/२०२५ रोजी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. दत्तात्रय कराळे व पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री. बाळासाहेब पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार लासलगाव पोलीस ठाणे हद्दीतील विंचुर परिसरात काही संशयीत अवैधरित्या एमडी (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ कब्जात बाळगुन विक्री करण्याचे उद्देशाने येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांनी सदर प्रकरणी तात्काळ दखल घेवुन, छापा कारवाईकामी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. हरिष खेडकर, निफाड उपविभाग, पोलीस निरीक्षक स्थागुशा श्री. रविंद्र मगर, लासलगाव पो.स्टे. चे सपोनि भास्कर शिंदे यांना तसेच मा. विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांचे पथकातील पोउनि अरूण भिसे आणि नाशिक ग्रामीण पोलीसांचे विशेष पथकातील पोउनि शैलेश पाटील यांना मार्गदर्शन करून सुचना दिल्या. त्यानुसार दोन्ही पथकांनी फॉरेन्सिक टीम, पंच, फोटोग्राफर यांचेसह लासलगाव पोलीस ठाणे हद्दीतील विंचुर शिवारात विंचुर एम. आय.डी.सी. कडे जाणारे रोडवर सापळा रचुन खालील दोन आरोपींना ताब्यात घेतले.
१) याकुब खालीद मोमीन, वय ४६, रा. इस्लामपुरा, विंचुर, ता. निफाड, जि. नाशिक
2) संदेश अंबादास फापाळे, वय 35, रा. मरळगोई खु., ता. निफाड, जि. नाशिक
ताब्यात घेतलेला आरोपी क. १. याकुब खालीद मोमीन याचे कब्जातील स्कुटीमध्ये विक्रीसाठी आणलेला ३१५ ग्रॅम ९ मिली वजनाचा एम.डी. अंमली पदार्थ छापा कारवाईत जागेवरच ताब्यात घेण्यात आला. त्यास सदर अमली पदार्याबाबत विचारपुस केली असता, त्याने आरोपी क. २. संदेश फापाळे, याचे मार्फतीने सदर एम.डी. पावडर आणल्याची कबुली दिली. तसेच दोन्ही आरोपींना अधिक विश्वासात घेवुन चौकशी केली असता, आरोपी क. १ याचे घराचे झडतीमध्ये ३८६ ग्रॅम ४१ मिली वननाचा एम. डी. पावडरचा साठा मिळुन आला. सदर छापा कारवाई यातील आरोपीतांचे कब्जातुन एकूण ७०१ ग्रॅम ०५ मिली वजानाचा कि. रू. ४९,१०,५००/- एम.डी. पावडरचा साठा व टी.व्ही.एस. ज्युपीटर स्कुटी, मोबाईल फोन असा एकूण ५०,१५,५०० रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील आरोपी हे विनापरवाना बेकायदेशीररित्या मानवी मनावर विपरीत परिणाम करणारा एम.डी. पावडर नावाचा अंमली पदार्थ संगनमताने वितरण व विक्री करण्याचे उद्देशाने स्वतःचे कब्जात बाळगतांना मिळुन आले असुन त्यांचेविरूध्द लासलगाव पोलीस ठाणेस गुरनं १४/२०२६ एन.डी.पी.एस. कायदा १९८५ चे कलम ८ (क), २२ (क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री. आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. हरिष खेडकर नाशिक ग्रामीण चार्ज निफाड विभाग, पोलीस निरीक्षक स्थाागुशा श्री. रविंद्र मगर, पोउनि हर्षल भोळे, मा. विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांचे पथकातील पोउनि अरूण भिसे, विशेष पथकातील पोउनि शैलेश पाटील, लासलगाव पो.स्टे. चे सपोनि भारकर शिंदे, पोउनि मोहन पाटील, पोलीस अंमलदार सुशांत मरकड, प्रमोद मंडलीक, भाउ झाडे, शांताराम जाधव, किशोर पाटील, प्रविण गांगुर्डे, मंगेश गोसावी, विक्रांत मांगडे, स्वप्निल माळी, कल्पना शिंदे, रविंद्र गवळी, शंकर साबळे, संदिप निचळ, ज्ञानेश्वर जाधव, सागर आरोटे, अविनाश सांगळे, औदुंबर मुरडनर, सतिष जगताप यांचे पथकाने सदर कारवाई केली आहे.





