अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असणारा शामसुंदर विश्वनाथ गुजर (बक्कल नं. 2205) हा खाकी वर्दीतला ड्रग्ज माफिया असल्याचं उघड झालं असून, पुणे पोलिसांनी पहाटे चार वाजला त्याला अटक केली आहे. शामसुंदर पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत गॅरेज चालक शादाब रियाज शेख (वय 41) याला 1 किलो 52 ग्रॅम एमडीसह अटक करण्यात आली. चौकशीत हा २५ कोटींचा एमडी थेट नगर एलसीबीतील शाम गुजरने पुरविल्याचं स्पष्ट झालं आणि पोलीस खात्यात खळबळ उडाली.





